ETV Bharat / city

ममता बॅनर्जी फॅसिस्ट नाहीत, त्यांच्यावरील टीका अयोग्य;मलिकांची प्रतिक्रिया - सामना पेपर नवाब मलिक

आम्ही काही 'सामना पेपर' पाहिला नाही. पण सामनामध्ये ममता बॅनर्जी यांना फॅसिस्ट म्हणून लिहले जात असेल तर अशी टीका योग्य नाही. ममता बॅनर्जी या भाजप विरोधी आहेत. ( Mamta Banerjee Mumbai Visit ) सामनामध्ये केलेल्या टिकेवर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मी कोणालाही घाबरत नाही. मी मरणालाही घाबरत नाही आणि जेलमध्ये जायलाही घाबरत नाही. ( Malik Vs BJP ) कुणी सत्तेचा वापर करून जर तसे प्रयत्न करत असतील तर त्यांना आपण भीक घालत नाही असही मलिक म्हणाले आहेत.

नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Dec 5, 2021, 1:35 PM IST

मुंबई - आम्ही काही 'सामना पेपर' पाहिला नाही. पण सामनामध्ये ममता बॅनर्जी यांना फॅसिस्ट म्हणून लिहले जात असेल तर अशी टीका योग्य नाही. ( Saamana Rokhthok Comment On Mamta ) ममता बॅनर्जी या भाजप विरोधी आहेत. सामनामध्ये केलेल्या टिकेवर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मी कोणालाही घाबरत नाही. मी मरणालाही घाबरत नाही आणि जेलमध्ये जायलाही घाबरत नाही. ( Mamta Banerjee Mumbai Visit ) कुणी सत्तेचा वापर करून जर तसे प्रयत्न करत असतील तर त्यांना आपण भीक घालत नाही असही मलिक म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक
ममता बॅनर्जी हा फॅसिस्ट नाही यांच्यावर केलेली टीका चुकीची

सामनामध्ये ममता बॅनर्जी यांना फॅसिस्ट म्हणून टीका केल्यानंतर याविषयी राष्ट्रवादी प्रवक्ता नवाब मालिक यांना विचारले असता आम्ही सामना पाहिला नाही असे खोचक विधान केले. मात्र त्यांना फॅसिस्ट म्हणून संबोधले गेले असल्यास त्यांच्यावर केलेली ही टीका चुकीची असल्याचा मत त्यांनी व्यक्त केले. ममता बॅनर्जी या भाजपविरोधी आहे त्यामुळे त्यांना फॅसिस्ट म्हणणे योग्य नाही. ( Mamta Banerjee Mumbai Visit ) देशामध्ये काँग्रेस शिवाय विरोधी पक्ष निर्माण करणे शक्य नाही. यूपीएमध्ये वेगवेगळे जवळपास दीडशे घटक आहेत. त्या सर्वांना एकत्रित आणून एक प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करण्याचा काम राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करीत आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना एकत्रित आणून सत्ता स्थापन करण्याचा काम शरद पवार यांनी केले होते. ( Nawab Malik Allegations ) जे शक्य नव्हते ते शरद पवार यांनी करून दाखवले त्यामुळेच येत्या काळातही सर्वांना एकत्रित आणून सर्वांच्या नेतृत्वात एक प्रबळ विरोधी पक्ष तयार करू असही नवाब मलिक म्हणाले आहेत.

महामंडळाचा विलगीकरण शक्य नाही

परिवहन महामंडळाचे सध्या सुरू असलेले संपाबाबत आणि शासनाने त्याच्यावर मेस्मा लावण्याची दिलेली धमकी या विषयी विचारले असता, नवाब मलिक यांनी सांगितले की आत्तापर्यंत शासनाने आणि अनिल परब यांनी संयमाने आपली भूमिका मांडली. ( ST Workers Strike ) मात्र, या आंदोलनामध्ये भाजपाचे दोन नेते शिरूर या आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचे प्रयत्न करीत होते. कोणतीही महामंडळ असेल त्यांचा राज्य शासनामध्ये विलगीकरण करणे सध्या तरी शक्य नाही. याउलट या परिवहन मंडळाला कशा पद्धतीने नफ्यात आणता येईल याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त वेतन कर्मचाऱ्यांना कसा मिळेल याकडे आमचा प्रयत्न आहे असे नवाब मलिक यांनी सांगितले.

जो डर गया वो मर गया, मी कुणालाही घाबरत नाही

अनिल देशमुख याप्रमाणे तुमची ही परिस्थिती करू असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. त्यावर भाष्य करताना नवाब मलिक यांनी सांगितलं जो डर गया वो मर गया, मी कोणालाही घाबरत नाही, मी कोणतेही चुकीचे कार्य केले नाही. त्यामुळे मला कुणाची भीतीही नाही. ( Malik Vs BJP ) केंद्राने त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून जर माझी हत्या ही केली तरी मला त्याची भीती नाही. काही चुकीच्या अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्यास त्यांच्या विरोधात आवाज उचलताना भाजपा त्याच्या पाठीशी उभी राहते. तर, मुंबई बँकेतील घोटाळ्यात प्रवीण दरेकर यांनी कशा पद्धतीने घोटाळा केलेला आहे. (ST should be merged with the government) या विषयी संपूर्ण माहिती लवकरच बाहेर येणार आहे. एक हजार कोटीचा मानहानीचा दावा केल्याचे दरेकर यांनी ट्विट केले होते त्यावर मी त्यांना ट्विट करून किसमे कितना है दम असे सांगितले होते. या आखाड्यामध्ये माझ्याशी दोन हात केल्याशिवाय दरेकरांना पर्याय नाही. आता या आखाड्यात दरेकरांना हे दाखवून देणार आहे की खरंच कोनामध्ये किती दम आहे. दरेकर हा कुठला मजूर आहे, कुठे फावडा लावला आहे, कुठे जेसीपी लावून काम केलेले आहे या विषयी संपूर्ण माहिती दिल्या शिव्या मी थांबणार नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - भाजप नेत्यांनी आम्हाला संस्कारांचे धडे द्यावेत हा मोठा 'विनोद' -यशवंत जाधव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.