मुंबई - देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आता 'बनारस मॉडेल'चा प्रचार करण्यात येत आहे. मात्र असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. बनारसच्या घाटावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे लोकांनी मृतदेह गंगेत सोडून दिले. या घटनेची देशभर चर्चा झाली, असेही यावेळी मलिक यांनी म्हटले आहे.
'बनारस मॉडेल अयशस्वी'
दरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी आता बनारस मॉडेल बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र बनारस मॉडेलमध्ये काही तथ्य नाही. तिथे ना कोरोना चाचण्या होत ना उपचार, औषधांचा देखील काळाबाजार झाला. ऑक्सिजनची देखील विक्री झाली. बनारस मॉडेल हे 'निदान' मॉडेलप्रमाणे अयशस्वी झाले. त्यामुळे आता या मॉडेलचा प्रचार करू नये अंस देखील मलिक यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - माजी पंतप्रधान राजीव गांधींची 30वी पुण्यतिथी; राहुल आणि प्रियंका गांधींनी वाहिली श्रद्धांजली