ETV Bharat / city

मुंबई : माहीम पोलिसांकडून 12 लाखांची ड्रग्ज जप्त, आरोपीला अटक

माहीम परिसरामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना माहीम गुन्हे शाखे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत तस्करी करणाऱ्या आरोपी अहमद शेख (वय 62) याला 110 ग्राम एमडीसह माहीममध्ये पकडले.

Mahim police seize drugs
ड्रग जप्त माहीम पोलीस कारवाई
author img

By

Published : Jun 15, 2022, 11:47 AM IST

मुंबई - माहीम परिसरामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना माहीम गुन्हे शाखे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत तस्करी करणाऱ्या आरोपी अहमद शेख (वय 62) याला 110 ग्राम एमडीसह माहीममध्ये पकडले. 12 लाख 25 हजार इतकी जप्त केलेल्या एमडीची किंमत आहे.

हेही वाचा - Mumbai High Court : कांजुर कारशेड भूखंड नेमका कुणाचा आज उच्च न्यायालयात होणार 'फैसला'

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करी प्रकरणात यापूर्वी आरोपी अहमद शेखचा मुलगा आणि मुलीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या ड्रग्ज तस्कर बापाला देखील माहीम गुन्हे शाखेकडून मंगळवारी अटक करण्यात आली. आज या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

माहीम पश्चिमेकडील कनाकिया टॉवरजवळील गल्लीत एक जण एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती वरळी युनिटला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरावर पाळत ठेवली. दरम्यान अहमद शेख हा एमडी घेऊन तेथे येताच पोलिसांनी त्याला हटकले. तेव्हा पोलीस असल्याचे समजताच अहमदने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 110 ग्राम एमडीचा साठा मिळाला. हे एमडी त्याने कुठून आणले व ते तो कोणाला विकणार होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान याआधी वरळी युनिटने अहमदचा मुलगा जावेद ऊर्फ जावा याला एक किलो 150 ग्राम वजनाच्या चरससह पकडला होते. तर, घाटकोपर युनिटने अहमदची मुलगी हजमा हिला 100 ग्राम एमडी आणि दोन किलो 700 ग्राम चरस साठ्यासह पकडले होते. मुलगा व मुलगी नंतर आता त्यांचा बाप ड्रग्जसह पोलिसांच्या हाती लागला.

हेही वाचा - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे होणार निवृत्त, नव्या आयुक्त पदासाठी 'या' नावांची चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.