ETV Bharat / city

Maharashtra weather forecast : पावसामुळे मुंबईची तुंबई, राज्यातील 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान..

5 ते 8 तारखेला कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 5 ते 8 जुलै 2022 दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेशात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 8 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 5, 8 आणि 9 रोजी विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra weather forecast
महाराष्ट्र हवामान
author img

By

Published : Jul 6, 2022, 7:41 AM IST

Updated : Jul 6, 2022, 11:10 AM IST

मुंबई - मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून ( Maharashtra weather forecast ) त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. दरम्यान काल मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा (200 मिमी पेक्षा जास्त) मुंबई ठाण्यासाठी देण्यात आला आहे. 5 ते 8 तारखेला कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 5 ते 8 जुलै 2022 दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेशात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 8 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 5, 8 आणि 9 रोजी विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागांत अती मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहे.

  • पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧
    📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे.
    🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी... https://t.co/kxlIAKcXa7

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Isolated heavy rainfall very likely over Telangana on 05th, 08th & 09th; Marathwada during 05th-08th; Coastal Karnataka during 07th-09th; South Interior Karnataka & Kerala & Mahe during 06th-09th; Odisha during 06th-08th and over East Madhya Pradesh during 05th-09th July, 2022. pic.twitter.com/ZWUGBo9IRQ

    — India Meteorological Department (@Indiametdept) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • West Madhya Pradesh on 05th & 08th; Vidarbha on 05th, 08th & 09th; Chhattisgarh on 07th & 08th and over Odisha on 05th & 09th July, 2022.

हेही वाचा - CBI issues look-out Notice : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून लूक आऊट नोटीस

5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज - ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.

या भागांत काही दिवस पावसाची शक्यता - मुंबई, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागात आधीच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, आता हा ऑरेंज अलर्ट 5 दिवसांवरून पुढचे 8 दिवस करण्यात आला आहे.

पुढचे काही दिवस ऑरेंज अलर्ट - मुंबई आणि परिसरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. या पावसाळ्यात महाराष्ट्रासाठी 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वेगळ्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजामुळे प्रशासनाकडून लोकांना योग्य खबरदारी घेण्यास आणि पाणवठ्यांजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा - या सर्वांबाबत हवामान विभागाचे अधिकारी जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस पडेल. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई तसेच उपनगरासह मुंबईच्या आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा काहीसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे मुंबई हवामान विभागाकडून या परिसरात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा." असं आवाहन जयंत सरकार यांनी केल आहे.

नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली - कोकणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच चिपळूणच्या परिस्थितीकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सोमवारी सकाळपासून पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Maharashtra Rain Update ) कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, परशुराम घाटात कोसळली दरड - मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, परशुराम घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परशुराम घाटात दरड कोसळली आहे. ( Mumbai Heavy Rain ) वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आहे. सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सखल भागांत पाणी साचले - सोमवारपासून पावसाने दमदार हजेरी मुंबई आणि महाराष्ट्राच्या ( Mumbai and Maharashtra ) काही जोरदार भागांमध्ये लावली. मुंबईत सोमवारी पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळी कार्यालयाला पोहोचणार्‍या चाकरमान्यांना कसरत करावी लागत आहे. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने या भागांमधील वाहतूक मंदावली होती.

आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या

मुंबई - 25.8 अंश सेल्सिअस

पुणे - 22.8 अंश सेल्सिअस

नागपूर - 25.6 अंश सेल्सिअस

नाशिक - 23.4 अंश सेल्सिअस

सोलापूर - 24.2 अंश सेल्सिअस

कोल्हापूर - 22.21 अंश सेल्सिअस

जळगाव - 28.2 अंश सेल्सिअस

वरील सर्व जिल्ह्यांच्या तापमानाचे निरीक्षण आयएमडीकडून आज पहाटे 5.30 ला झाले आहे.

हेही वाचा - 'सावरकरांची बदनामी होत होती पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Last Updated : Jul 6, 2022, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.