मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी मोठ्या पावसाने मात्र दडी मारली आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. अशा स्थितीत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. राज्य मान्सूनने व्यापले आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात जोरदार पावसाला सुरूवात होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला ( Heavy Rain Alert Maharashtra ) आहे.
राज्यातील बहुतांशी भागात पावसाची प्रतीक्षा असल्याने अनेक ठिकाणा पेरण्या खोळंबल्या आहेत. यंदा पाऊस वेळेआधी येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र जूनचे पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरी राज्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. राज्यात येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आगामी काळात मुसळधार पाऊस होईल. १७ जून रोजी व्यक्त करण्यात आलेल्या या अंदाजात येत्या ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
तसेच पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असून, त्यानंतरच्या 3 दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
हेही वाचा : Maharashtra weather forecast : 'या' तारखेला विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता