मुंबई - राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार असून दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दुसरी लाट आटोक्यात येत असताना काल सोमवारी ४,१४५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन ४,४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल सोमवारी १०० मृत्यूची नोंद झाली, आज त्यात किंचित वाढ होऊन ११६ मृत्यूंची नोंद झाली आहे.
५ हजार ४२४ रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात ५ हजार ४२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०१,१६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ४ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ११६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३५,२५५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१२,९१,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०१,२१३ (१२.४८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,८०७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६१,३०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.११ टक्के
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
'या' विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - १९६
रायगड - ७९
पनवेल पालिका - ५०
अहमदनगर - ५२२
पुणे - ३५९
पुणे पालिका - १९३
पिपरी चिंचवड पालिका - १४५
सोलापूर - ५२९
सातारा - ८२१
कोल्हापूर - १६७
सांगली - ५१०
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ४८
सिंधुदुर्ग - ४०
रत्नागिरी - १४२
उस्मानाबाद - ५८
बीड - ११५
हेही वाचा - राज्यातील बार, मॉल सुरू मग मंदिरे का बंद ? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल