ETV Bharat / city

Maharashtra Ministry Restictions : निर्बंधमुक्त राज्यातून मंत्रालयाला वगळले?

राज्यातील सरसकट निर्बंध हटवले असले ( Maharashtra State Free Restrictions ) तरी, मंत्रालयात प्रवेशाकरिता नियमांची जाचक अट कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो ( Maharashtra Ministry Restrictions ) आहे.

Maharashtra Ministry
Maharashtra Ministry
author img

By

Published : Apr 11, 2022, 6:08 PM IST

Updated : Apr 11, 2022, 9:55 PM IST

मुंबई - राज्यातील सरसकट निर्बंध हटवले असले ( Maharashtra State Free Restrictions ) तरी, मंत्रालयात प्रवेशाकरिता नियमांची जाचक अट कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो ( Maharashtra Ministry Restrictions ) आहे. तसेच, वेळ ही वाया जात असल्याचे चित्र मंत्रालयाच्या गेटवर पाहायला मिळते.

प्रतिनिधी नागरिकांशी संवाद साधताना

मंत्रालयात कोरोना निर्बंधापूर्वी अभ्यागटांना दुपारी दोननंतर त्यांच्या ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश देण्याची संगणकीकृत व्यवस्था होती. गार्डन गेटकडून त्यांना प्रवेश दिला जात होता. आता फोटो काढून पास देण्याची पद्धती बंद केली. त्यामुळे मंत्रालयात अभ्यागट यांची वर्दळ कमी झालीच, शिवाय कोरोनानंतर हे प्रमाण जवळपास थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर नियमांच्या आधारे प्रवेश देण्यात येऊ लागला. कोरोनाच्या दोन्ही लसींचे डोस बंधनकारक केले. लोकप्रतिनिधी, मंत्री, कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ओळखीच्या लोकांसाठी कोरोना लसींचे प्रमाणपत्र दाखवायचे आणि मंत्री कार्यालयातून प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे हा प्रयोग नंतर सुरू झाला आहे. मात्र, याचा सर्वसामान्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मंत्रालयात प्रवेशासाठी तिष्ठत उभे लागते - गुढीपाडव्यापासून राज्यातील सर्व निर्बंध हटवले आहेत. मास्क देखील ऐच्छिक आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. असे असताना मंत्रालयात प्रवेशासाठी कोविड नियमांची सक्ती केली जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच सरकारी व खासगी कार्यांलयामध्ये प्रवेशासाठी कोणतीही बंधने नसताना मंत्रालयात मनाई कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातोय. मंत्री कार्यालयातील कर्मचारी सध्या बाहेरून माणसांना आत आणण्याच्या कामातच व्यस्त असतात. मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना पास तयार करून घ्यायचा गेटवर जायचे आणि त्यांना आत आणायचे, यातच बहुतांश वेळ त्यांचा वाया जातो. सर्व सामान्यांना कार्यालयातून कुणी येऊन आपल्याला मंत्रालयात प्रवेश मिळेल, म्हणून तासनतास तिष्ठत उभे असल्याचे चित्र मंत्रालयाच्या प्रवेश द्वारावर पाहायला मिळत आहे.

मंत्रालयातच निर्बंध का? - गेल्या दोन वर्षांपासून कोविड संकट होते. आता कुठे निर्बंध उठले आहेत. मंत्रालयात काम होईल, या अपेक्षेने शेकडो किलोमीटर लांबून येथे येतो. पण, कोविडच्या नियमाचे कारण देऊन प्रवेश दिला जात नाही. राज्यातील निर्बंध उठवले असताना, या ठिकाणी का नियम लावले आहेत, असा सवाल प्रवेशद्वारावरील नागरिकांनी 'ईटीव्ही भारत'कडे व्यक्त केला.

हेही वाचा - INS Vikrant Case : आयएनएस विक्रांतचा निधी पक्षाला दिला; सोमैयांच्या वकिलांचा युक्तीवाद

Last Updated : Apr 11, 2022, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.