मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील स्ट्रेनमुळे रुग्ण वाढत आहे. आज नव्या 43 हजार 183 रुग्णाची नोंद झाली आहे. तर 249 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणाऱ्या मृत्यून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 32 हजार 641रुग्ण हे 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 24 लाख 33 हजार 368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या 43,183 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 249रुग्णांचा मृत्यू झाला झाला आहे. मृत्यूदर 1.92 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 28 लाख 56 हजार 163 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 3 लाख 66 हजार 533 इतके आहेत.
हेही वाचा-धक्कादायक..! गुरुवारी कोरोनामुळे नागपुरात ६० रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 8646
ठाणे- 616
ठाणे मनपा- 1465
नवी मुंबई-1,060
कल्याण डोंबिवली- 964
उल्हासनगर-214
मीराभाईंदर-423
पालघर-217
वसई विरार मनपा-361
रायगड-359
पनवेल मनपा-408
नाशिक-1,258
नाशिक मनपा-1,781
अहमदनगर- 891
अहमदनगर मनपा-388
धुळे- 283
धुळे मनपा - 160
जळगाव- 565
जळगाव मनपा- 500
नंदुरबार-466
पुणे- 1,767
पुणे मनपा- 4,200
पिंपरी चिंचवड- 2,058
सोलापूर- 370
सोलापूर मनपा-386
सातारा - 528
सांगली- 194
औरंगाबाद मनपा-943
औरंगाबाद-511
जालना-316
हिंगोली- 103
परभणी -252
परभणी मनपा-197
लातूर मनपा-385
लातूर 293
उस्मानाबाद-287
बीड -394
नांदेड मनपा-660
नांदेड-662
अकोला -143
अकोला मनपा-311
यवतमाळ-259
बुलडाणा-365
वाशिम - 296
नागपूर- 1,109
नागपूर मनपा-2,587
वर्धा-365
भंडारा-750
गोंदिया-163
चंद्रपुर-400
चंद्रपूर मनपा-126
हेही वाचा-कोरोना किमान दहा वर्ष तरी जाणार नाही, मात्र तो पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो - डॉ ए एम देशमुख
मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच; 8646 नवे रुग्ण, 18 जणांचा मृत्यू
मुंबईत सलग तीन दिवस तीन हजारावर, त्यानंतर सलग तीन दिवस पाच हजारावर तर दोन दिवस 6 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या घटली होती. काल पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आज त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तब्बल 8646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 18 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.