ETV Bharat / city

'राज्यात सध्या अघोषित आणिबाणी'; हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांचा टोला - देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर टीका

शेतकरी, महिला, गरीबांच्या समस्येवर चर्चा करायला जे सरकार तयार नाही, त्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

-tea-party-on-winter-sessions-eve
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
author img

By

Published : Dec 13, 2020, 5:19 PM IST

Updated : Dec 14, 2020, 6:27 AM IST

मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारनं आज आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपनं बहिष्कार टाकला आहे. सरकार कोणत्याही घटकाला सकारात्मक प्रतिसाद देत नाही, आम्ही त्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतो असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शेतकरी, महिला, गरीबांच्या समस्येवर चर्चा करायला जे सरकार तयार नाही त्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. महाराष्ट्रात सध्या अघोषित आणिबाणी आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

भाजपची पत्रकार परिषद

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पत्रकार परिषद झाली. फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले , की कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणारा आहे. कोरोनाची लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत मात्र सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तसंच अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती मिळाली ती या सरकारच्या अयोग्य भूमिकेमुळेच असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

अधिवेशनही अवघ्या सात तासांचं घेतलं जातं आहे. त्याला काहीही अर्थ नाही आम्ही जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सरकारने वाढीव वीज बिलांबाबत घूमजाव केलं असून कोल्हापुरात पुरात वाहून गेलेल्या एका घरालाही अडीच हजारांचं बिल पाठवण्यात आलं आहे त्यावरुनच सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -

  • - हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये आणि किमान दोन आठवड्यांचे झाले पाहिजे होते, मात्र हे सरकार चर्चेला घाबरत आहे.
  • - शेतकरी, महिला, गरीबांच्या समस्येवर चर्चा करायला जे सरकार तयार नाही, त्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत.
  • - महिलांवर अत्याचार वाढले आहेत. कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाले. आता सरकार शक्ती कायदा आणत आहे, मात्र या सरकारने आणलेला कायदा फक्त कागदावर राहू नये, तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी कायदा उपयोगी ठरला पाहिजे.
  • - मराठा समाज आरक्षणाला या सरकारच्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयात स्थिगिती मिळाली आहे. ओबीसी आरक्षणाबद्दलही या सरकारची भूमिका संदिग्ध आहे. या दोन्ही आरक्षणाबद्दल सरकारने स्पष्ठ भूमिका मांडली पाहिजे.
  • - विद्यूत देयकांच्या मुद्द्यावर सरकारने सरड्याप्रमाणे वेळोवेळी रंग बदलले आहेत. आता सरड्यालाही लाज वाटेल एवढे रंग या सरकारने बदलले आहेत.
  • - मेट्रो कारशेडला कांजूरमार्गला नेऊन मेट्रोला चारवर्षे उशिर होणार आहे, असा अहवाल सैनिक कमिटीने दिला आहे. त्याकडे सरकारने दुर्लक्ष करुन कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुंबईकरांना मोठा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. कारशेडचा निर्णय हा राजकीय आकसातून घेतलेला आहे.
  • - अवघे सहा तासांचे हे अधिवेशन आहे, तेवढ्या वेळेतही आम्ही जनतेचे दुःख आणि व्यथा सरकारसमोर मांडणार आहोत.

Last Updated : Dec 14, 2020, 6:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.