मुंबई - नागपूर आणि अकोला या दोन्ही जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार (MLC Election Result 2021 ) निवडून आले. मात्र हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab malik on MLC Election Result ) यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात विधान परिषदच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार थांबवायचा असेल तर (Law against Horse trading in MLC Election) कायदा करण्याची गरज असल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभेतील निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रकारे घोडेबाजार होत होता. हा घोडेबाजार थांबावा म्हणून संसदेत कायदा करण्यात आला. राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा आहे. त्याचप्रकारे विधान परिषदेमध्ये देखील कायदा करण्याची गरज आहे. याबाबत राज्य सरकार कायदा करू शकणार असेल तर येणाऱ्या काळात राज्य सरकार कशी पावले उचलणार. मात्र राज्य सरकारच्या अधिकारात कायदा करणे शक्य नसेल. तर, केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून कायदा करावा. जेणेकरून भविष्यात विधानपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार होणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे असं मतही नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
नागपूरमध्ये बावनकुळेंचा विजय -
विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
अकोल्यातही भाजपचा विजय -
अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा 110 मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना 331 तर भाजपचे उमेदवार खंडेलवाल यांना 441 मते मिळाली आहेत.