ETV Bharat / city

संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

author img

By

Published : Feb 9, 2021, 10:12 AM IST

Updated : Feb 9, 2021, 1:08 PM IST

सरकार आणि विरोधकांनी मिळून आंदोलक शेतकऱ्यांना भेटावे - श्रीनिवास पाटील

12:48 February 09

रामदास आठवलेंचा खास शैलीतून आझाद यांना निरोप

नवी दिल्ली : खासदार रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा सदनात येण्याची इच्छा व्यक्त केली.  

राज्यसभा छोडकर जा रहे हैं गुलाम नबी

हम मिलते रहेंगे आपको कभी कभी

आपका नाम है गुलाम

मैं इसिलिए करता हूँ आपको सलाम

आपका नाम है गुलाम, लेकीन आप हमेशा रहें आझाद

आप हमेशा रहो आझाद

हम रहेंगे आपके साथ, ये अंदर की है बात

मोदी जी काश्मीरका मजबूत करेंगे हात

अशी कविता म्हणत आठवले यांनी आझाद यांनी पुन्हा सदनात येण्याची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसने तुम्हाला सदनात आणले नाही तर आम्ही आणू. इकडे काही अडचण नाही. मीही आधी तिकडे होतो, आज इकडे आहे. त्यामुळे तुम्हीही पुन्हा सदनात यावे अशी इच्छा मी व्यक्त करतो असे रामदास आठवले म्हणाले.  

12:38 February 09

आझाद पुन्हा सदनात येईपर्यंत मी त्यांची वाट बघेन - संजय राऊत

मी गुलाम नबी आझाद यांना निरोप देणार नाही, तर ते पुन्हा इथे येईपर्यंत त्यांची वाट बघेन असे शिवसेना खासदार संजय राऊत मंगळवारी राज्यसभेत बोलताना म्हणाले. आझाद निवृत्त होत आहे यावर मला विश्वासच बसत नाही. आझाद हे काश्मीरातील विना काट्याचे गुलाब आहेत असेही कौतुकोद्गार राऊत यांनी काढले.

आझाद यांना निरोप देताना स्वतः पंतप्रधान भावूक झाले. आझाद सदनात पुन्हा येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. मोठ्या राजकीय कालखंडाचे आझाद हे साक्षीदार राहिले आहेत. इंदिरा गांधींपासून तर मोदींपर्यंतच्या राजकीय स्थित्यंतराविषयी त्यांनी पुस्तक लिहिले पाहिजे असे मला वाटते. विदर्भात आजही आझाद यांचे चाहते आहेत. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. मात्र ज्यांना पूर्ण देश ओळखतो अशा मोजक्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझादांचे नाव येते असे राऊत म्हणाले.  

12:28 February 09

डॉ. विकास महात्मेंनी उपस्थित केला आरोग्याचा विषय

नवी दिल्ली : आरोग्य हा राज्यांचा विषय असल्याने सरकारच्या दिशानिर्देशांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यांवर येते. अशा परिस्थितीत हा मुद्दा कॉन्करन्ट लिस्टमध्ये घेण्याचा सरकारचा काही विचार आहे का असा प्रश्न खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला.

12:23 February 09

आरोग्य सेवा अधिकार कायदा आणणार का?- फौजिया खान

नवी दिल्ली : कोरोना संकटात आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा अधिकार मिळण्यासाठीचा कायदा आणणार आहे का? असा प्रश्न फौजिया खान यांनी उपस्थित केला.

12:18 February 09

वनक्षेत्र वाढविण्यासाठी केंद्राने राज्यांना सहकार्य करावे - वंदना चव्हाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यांना केंद्राच्या सहकार्याची गरज व्यक्त केली. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आपण चांगले काम करीत आहोत. मात्र कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आपण तरीही कमी पडत आहोत. यासाठी आपल्याला वनक्षेत्र वाढवावे लागणार आहे. यासाठी केंद्राने राज्य सरकारांना प्रोत्साहन देऊन यासाठी योग्य तो अर्थपुरवठा केला पाहिजे अशी मागणी वंदना चव्हाण यांनी केली. 

12:09 February 09

शरद पवार यांनी केले गुलाम नबी आझाद यांचे कौतुक

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा सदनाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने मंगळवारी सदनाकडून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले.

शरद पवारांची कौतुक सुमने

गुलाब नबी आझादांनी काँग्रेसचा विचार स्वीकारत युवक काँग्रेसचे काम पाहिले. संघटन कौशल्याचा वापर देशहितासाठी केला असे कौतुक शरद पवार यांनी केले. नव्या पिढीला संघटीत करण्याचे काम त्यांनी केले. १९८२ मध्ये वाशीममधून ते लोकसभेची निवडणूक लढले. यावेळी आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार केला. मात्र ते निवडून आले. यानंतर मात्र त्यांनी वाशीममधल्या लोकांचा विश्वास संपादन करत तिथल्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. याशिवाय विदर्भाच्या विकासाकडेही त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे ते तिथून पुन्हा निवडून आले. यामुळेच आजही वाशीमची जनता त्यांची आठवण काढते असे कौतुक पवार यांनी केले.  राजकीय मतभेद असूनही वैयक्तिक सलोखा जपण्याचे कौशल्य गुलाम नबी आझाद यांच्याकडे आहे. विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत असे पवार यावेळी म्हणाले.

10:25 February 09

प्रजाहितापेक्षा अहंकार मोठा झाल्यावर राजाचा नाश होतो - अमोल कोल्हे

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी लोकसभेत बोलताना शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. राजाचा अहंकार प्रजाहितापेक्षा मोठा झाला की त्याच्या सत्तेचा नाश होतो हे चाणक्यांनी सांगितले आहे असे म्हणत शेतकरी आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आंदोलनजीवी शब्दावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील भाजपचे नेते कोणत्याही मुद्द्यांवर आंदोलने करतात. त्यामुळे त्यांना येथून पुढे काय म्हटले पाहिजे ते आम्हाला आता कळले असे कोल्हे म्हणाले. नव्या संसद भवन इमारतीच्या उभारणीवरही त्यांनी टीका केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना संसद भवनापेक्षा रुग्णालये उभारण्याची गरज आहे. केवळ 22 एम्सने काहीही होणार नाही. त्यामुळे आधी रुग्णालये आणि नंतर संसद भवन अशी प्राथमिकता सरकारने ठेवली पाहिजे. संसद भवनाची मागणी कुणीही केलेली नाही. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला तातडीने खासदार निधी दिला जावा. जीएसटीची 25 हजार कोटींची थकबाकी तातडीने महाराष्ट्राला देण्यात यावी अशी मागणी कोल्हे यांनी केली. वाढती बेरोजगारी आणि सरकारी संस्थांच्या विक्रीवरही त्यांनी टीका केली आहे.

10:03 February 09

नवी दिल्ली : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी राज्यसभेत बोलताना शेतकरी आंदोलनावरून सरकारवर  टीका केली. सरकार आणि विरोधी पक्षांनी मिळून आंदोलक शेतकऱ्यांना भेटले पाहिजे असे मत त्यांनी मांडले. याशिवाय साताऱ्यातील सैनिकी शाळेतील समस्यांचा मुद्दाही मांडला. नव्या सैनिकी शाळा सुरू करतानाच जुन्या सैनिकी शाळांच्या स्थितीकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली. 

Last Updated : Feb 9, 2021, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.