ETV Bharat / city

विधानपरिषद रणधुमाळी : अमरावती मतदान संघात किरण सरनाईक यांना आघाडी; पाहा LIVE अपडेट्स..

Maharashtra Graduate and teacher constituency election results LIVE Updates
पदवीधर-शिक्षक मतदार संघांचे आज निकाल; पाहा LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Dec 3, 2020, 7:00 AM IST

Updated : Dec 3, 2020, 9:14 PM IST

21:12 December 03

नागपूर - पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांची आघाडी कायम आहे. तर दुसऱ्या फेरीत अभिजित वंजारी यांना ११४९७ मते तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना ९०८५ मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअंती अभिजित वंजारीकडे ७३३४ मतांची आघाडी आहे. 

20:55 December 03

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीच्या आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पिछाडीवर असून वाशिमचे अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी 6073 मते घेऊन पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

20:26 December 03

औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यात पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हे १७ हजार ३७२ मतांनी आघाडीवर आहेत.

पहिल्या फेरीची आकडेवारी - 

पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीची २७ हजार ८७९ मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीची १० हजार ९७३ मते पडली आहेत. दरम्यान, पोस्टल मतदानातही सतीश चव्हाण यांना १०७३ पोस्टल मतांपैकी ६०० पोस्टल मते पडली असून त्यांनी पोस्टल मतांत ३१४ मतांनी आघाडी घेतली आहे. प्रारंभी पोस्टल मते मोजण्यात आली आहेत. त्यापैकी सतीश चव्हाण यांना ६००, भाजपचे शिरीष बोराळकर यांना २८६ पोस्टल मते मिळाली आहेत. तर नागोराव पांचाळ 45, कुणाल खरात 3, सचिन निकम - 3, सिरिष कांबळे 3, अशी मते मिळाली आहेत. 

रात्री उशिरा मतमोजणी प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

16:46 December 03

पुणे - शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम

16:45 December 03

पुणे पदवीधर मतमोजणी - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अरुण लाड यांची मुसंडी तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर 

15:52 December 03

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाच्या 14 हजार मतांपैकी किरण सरनाईक यांनी 831 मतांनी आघाडी घेतली आहे. किरण सरनाईक, श्रीकांत देशपांडे यांच्या पाठोपाठ शेखर भोयर हे स्पर्धेत आहेत.

15:42 December 03

हा महाविकास आघाडीचा पराभव आहे. अमरीश पटेल जरी भाजपमध्ये असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष चालवतात. मतदानासाठी 50 हजार ते 1 लाख भाव होता. महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे. मात्र, धुळ्यात बोगस कारभार चालत असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशांचा सर्रास केला जात आहे. - अनिल गोटेंची नाशिकमध्ये प्रतिक्रिया

15:42 December 03

अमरीश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले - राष्ट्रवादी नेते अनिल गोटे यांचा घणाघाती आरोप

15:33 December 03

विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अमरिश पटेल यांची प्रतिक्रिया.

धुळे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातून भाजप उमेदवार अमरीश पटेल विजयी.

12:10 December 03

नागपूरमधील मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू..

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतपत्रिका एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीला एक वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे पहिला कल हाती येण्यास तीन वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

12:09 December 03

पुण्यातील मतमोजणी प्रत्यक्षात ३ वाजता होणार सुरू..

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतपत्रिका सरमिसळ करण्याचे काम सुरू आहे. पोस्टल मत पत्रिकाही एकत्र केल्या जात आहेत. दुपारी 2 पर्यंत हे सरमिसळ करण्याचे काम चालेल. त्यानंतर 3 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

09:20 December 03

धुळे-नंदुरबार निकाल जाहीर..

धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान पार पडले होते. त्याचा निकाल आज जाहीर झाला. याठिकाणी भाजपच्या अमरिश पटेल यांचा विजय झाला आहे. पटेल यांना ३३२ तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली.

09:19 December 03

पुण्यातील मतमोजणीला सुरुवात..

पुण्यातील मतमोजणीला सुरुवात..

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरुवात झाली आहे. यासोबतच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसही सुरुवात झाली आहे.

08:38 December 03

धुळे : विधान परिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात..

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणीला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सुरुवात झाली असून काही वेळातच पहिला कल हाती येणार आहे..

08:23 December 03

नागपुरमध्ये मतमोजणीला सुरुवात..

नागपुरमध्ये मतमोजणीला सुरुवात..

नागपूर विभागात झालेल्या पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे ही मतमोजणी होत आहे. सुरवातीला टपाली मतदानाची मोजणी सुरू झाली आहे, त्यानंतर बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे.

06:51 December 03

पदवीधर-शिक्षक मतदार संघांचे आज निकाल..

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहेत. एक डिसेंबरला पाच मतदारसंघांमध्ये या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने उभे होते. पाचही मतदारसंघ महत्त्वाचे असले, तरी पुणे आणि नागपूरच्या निकालांकडे जास्त लक्ष असणार आहे. यासोबतच, आज विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकींचेही निकाल समोर येणार आहेत.

Last Updated : Dec 3, 2020, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.