मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन ( Rebel Leader Eknath Shinde ) करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पत्र तयार केले आहे. बंडखोर आमदारांच्या स्वाक्षरी त्यावर घेण्यात ( Maharashtra Political Crisis ) आल्याचे समजते. तब्बल 40 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी राज्यपालांकडे जाऊन बहुमत सिद्ध करावे लागते. अशात राज्यपालांना कोरोना झाल्याने भाजप किंवा एकनाथ शिंदे गट पुढे काय करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात आणि सुरतमध्ये राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र गटासाठी 37 संख्या हवी आहे. परंतु, 40 आमदार असल्याचा दावा शिंदे ( 40 MLAs support Eknath Shinde ) करत आहेत. नुकताच शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल ( MLAs photo in Surat viral ) झाला आहे. व्हिडिओत आमदार निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आवश्यक मतांचा कोटा शिंदे यांनी पूर्ण केल्यास स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र राजभवनला लवकरच दिले जाण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्यपालांनाच कोरोना झाल्याने विविध निष्कर्ष लावले जात आहे.
तात्पुरता कार्यभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्याची शक्यता - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनाची लागण झाल्याने तात्पुरता कार्यभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्याबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. तसे झाल्यास शिंदे यांना गोव्याच्या राज्यपालांकडे स्वतंत्र गटाचे पत्र द्यावे लागेल. त्यामुळे शिंदे गोव्यात जाणार की महाराष्ट्रात येणार हे पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा - बंडखोर नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र गट स्थापन करणार? 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा