ETV Bharat / city

Thane Bay Area : ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; राज्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव - ठाणे खाडी क्षेत्र रामसर स्थळ मराठी बातमी

राज्य सरकारने ठाणे खाडी क्षेत्राला रामसर दर्जा ( Thane Bay Area ) मिळण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. केंद्राने मंजुरी दिल्यानंतर ठाणे खाडी क्षेत्र महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ होईल.

cm thackeray
cm thackeray
author img

By

Published : Feb 17, 2022, 6:52 PM IST

मुंबई - ठाणे खाडी क्षेत्राला ( Thane Bay Area ) 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याने रामसर स्थळाचा दर्जा मिळण्याचा मार्ग ( Maharashtra Government Proposal To Central Government ) मोकळा झाला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांच्या अध्यक्षतेखाली 9 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या राज्य पाणथळ प्राधिकरणाच्या चौथ्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरिक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील. तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले ( Cm Thackeray On Thane Bay Area ) आहे.

ठाणे खाडी

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौ.कि.मी क्षेत्रावर पसलेले आहे. खाडीचे अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित असून, त्यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित झाली आहे. त्यामुळे या परिसरातील जैवविविधता जपणे सुलभ होणार आहे.

महाराष्ट्रातील रामसर स्थळे

आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक मधील नांदूर मधमेश्वर अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. महाराष्ट्रातील हे पहिले रामसर स्थळ आहे. तर, बुलढाण्यातील लोणार सरोवर हे दुसरे रामसर आहे. ठाणे खाडील रामसराचा दर्जा मिळाल्यास ते महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ होईल. तसेच, जगातील 2424 पाणथळांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यात भारतातील 49 स्थळांना 'रामसर'चा दर्जा मिळाला आहे.

हेही वाचा - Bail Granted To Hindustani Bhau: हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.