ETV Bharat / city

Kurla Building Collapse : मुंबईत इमारत कोसळली, मृतांच्या वारसांना सरकारची पाच लाख रुपयांची मदत - कुर्ला दुर्घटना लेटेस्ट न्यूज

कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग सोमवारी रात्री ११.५० च्या सुमारास कोसळला ( building of Naik Nagar Society collapsed ). यात आतापर्यंत एकूण २३ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Kurla Building Collapse
मुंबईत इमारत कोसळली
author img

By

Published : Jun 28, 2022, 7:57 PM IST

मुंबई - कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर ( Kurla Building Collapse ) केली. जखमींवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दूर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करावेत. मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत.

17 जणांचा मृत्यू - कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग सोमवारी रात्री ११.५० च्या सुमारास कोसळला ( The building of Naik Nagar Society collapsed ). तळमजला अधिक तीन मजले अशी चार मजली इमारत आहे. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक ( 20 to 25 people under the pile ) अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्याकडून शोध मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत एकूण २३ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांची नावे -

  • किशोर प्रजापती, २० वर्षे
  • सिकंदर राजभर, २१ वर्षे
  • अरविंद भारती, १९ वर्षे
  • अनुप राजभर, १८ वर्षे
  • अनिल यादव, २१ वर्षे
  • शामू प्रजापती, १८ वर्षे
  • अजिंक्य गायकवाड, ३४ वर्षे
  • अजय बासफोर, २८ वर्षे
  • लीलाबाई गायकवाड, ६० वर्षे
  • रमेश बडिया, ५० वर्षे
  • अजून सात जणांची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा - Mumbai Building Collapse : कुर्ल्यात इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, २३ जणांना बाहेर काढले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.