मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशात संचारबंदी जाहीर केली. त्यामुळे हाताला काम नसल्याने राज्यातील अनेक शहरातून मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतरित करत आहेत. या कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगारांना आहे त्या शहरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांना निवारा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील विविध भागात अशा कामगारांसाठी २६२ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ठाकरे सरकारने ७० हजारपेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.
-
महाराष्ट्र सरकारने राज्यभरात २६२ मदत केंद्रांची स्थापना केली आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे या परिस्थितीत ७०३९९ राज्याबाहेरील व स्थलांतरित कामगार / बेघर लोकांना अन्न आणि आश्रय ही केंद्रे उपलब्ध करून देत आहे.#MaharashtraCares #WarAgainstVirus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र सरकारने राज्यभरात २६२ मदत केंद्रांची स्थापना केली आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे या परिस्थितीत ७०३९९ राज्याबाहेरील व स्थलांतरित कामगार / बेघर लोकांना अन्न आणि आश्रय ही केंद्रे उपलब्ध करून देत आहे.#MaharashtraCares #WarAgainstVirus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 29, 2020महाराष्ट्र सरकारने राज्यभरात २६२ मदत केंद्रांची स्थापना केली आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे या परिस्थितीत ७०३९९ राज्याबाहेरील व स्थलांतरित कामगार / बेघर लोकांना अन्न आणि आश्रय ही केंद्रे उपलब्ध करून देत आहे.#MaharashtraCares #WarAgainstVirus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 29, 2020
हेही वाचा... महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाखांचे विमा कवच द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी
राज्यातील विविध भागात उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात. त्यांच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आली आहे. असेही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशात लॉकडाउन झाल्यानंतर उद्योगधंदे आणि इतर व्यापारही बंद असल्याने हातावर पोट असलेल्या अनेकांनी आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न सुरु केला होता.
बाहेरील राज्यातील कामगारांनी तर स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. विविध टोल नाक्यावर त्या लोकांना पोलिसांनी अडवले आहे. गुजरातकडे जाणाऱ्या पाच कामगारांचा अहमदाबाद महामार्गावर रस्ते अपघातात मृत्यू देखील झाला. या घटनेचीगंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निवारा केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित जिल्हाधिकारी या निवारा केंद्राचे नियोजन करणार असून स्थलांतरित करणाऱ्या कामगारांची माहिती घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.