ETV Bharat / city

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ८ हजाराहून अधिक कोरोनारुग्ण, २५८ मृत्यूंची नोंद - maharashtra corona news

महाराष्ट्रात आज (शुक्रवार) २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६० हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

maharashtra corona updates
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 17, 2020, 9:01 PM IST

मुंबई - कोरोना महामारीचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (शुक्रवार) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात आज ८ हजार ३०८ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे.

  • राज्यात आज 8308 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 292589 अशी झाली आहे. आज नवीन 2217 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 160357 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 120480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak

    — Rajesh Tope (@rajeshtope11) July 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात एकूण संख्या १ लाख २० हजार ४८० कोरोना रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आजही उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - 'निवडणुका घ्या, अन्यथा चालू ग्रामपंचायतीला मुदतवाढ द्या,' प्रकाश आंबेडकर यांची मागणी

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० स्व‌ॅब नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे,

मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७,सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४, हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.