मुंबई - राज्यात कोरोनाची तिसरी लाट ( Corona Third Wave ) आटोक्यात येण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. आज ( शुक्रवारी ) दिवसभरात 24 हजार रुग्णांची नोंद ( 24 Thousand Corona Patients ) झाली. तर बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मृतांच्या आकडा मात्र वाढला असून आज 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णही अडीच लाखाच्या आसपास आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉनचे 110 रुग्ण आढळून आल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढले. वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध लागू केले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत घसरण होताना दिसून येत आहे. मंगळवारी 33 हजार 914 तर बुधवारी 33 हजार 756 रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी 25 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र आज (शुक्रवारी) 24 हजार 948 बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 103 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूदर 1.86 टक्के इतका आहे. दिवसभरात 45 हजार 648 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण 94.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 72 लाख 42 हजार 649 कोरोना बाधित बरे झाले आहेत. तर 7 कोटी 41 लाख 63 हजार 858 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 76 लाख 55 हजार 554 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 61 हजार 370 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 66 हजार 586 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ओमायक्रॉनचे 110 रुग्ण
राज्यात आज (शुक्रवारी) ओमायक्रॉनचे 110 नव्या बाधितांची नोंद झाली. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संस्थेने सर्व अहवाल तपासले आहेत. आज सापलेले सर्व पुणे मनपा विभागातील आहेत. राज्यात आजपर्यंत 3 हजार 40 एवढे रुग्ण आहेत. तर 1603 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 6605 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6418 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 187 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
'या' विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 1312
ठाणे - 100
ठाणे मनपा - 281
नवी मुंबई पालिका - 614
कल्याण डोबिवली पालिका - 51
मीरा भाईंदर - 42
वसई विरार पालिका - 84
नाशिक - 753
नाशिक पालिका - 1720
अहमदनगर - 703
अहमदनगर पालिका - 196
पुणे - 1452
पुणे पालिका - 3377
पिंपरी चिंचवड पालिका - 2099
सातारा - 751
नागपूर मनपा - 2161
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी १३१२ नव्या रुग्णांची नोंद, १० जणांचा मृत्यू