मुंबई - राज्यात कोरोना नियंत्रणात येत असून, आज (दि. 28 फेब्रुवारी) दिवसभरात केवळ 407 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 6 हजार 663 सक्रिय रुग्ण ( Active Patients ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 967 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.82 तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.4 टक्क्यांवर - आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून मृतांची टक्केवारी 1.82 टक्के इतकी स्थिर स्थावर आहे. दिवसभरात 967 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.4 टक्के असून आजपर्यंत 77 लाख 11 हजार 343 रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.
10.10 टक्के पॉझीटीव्हीटी दर - कोरोनाचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 78 लाख 75 हजार 104 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.10 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 65 हजार 705 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 33 हजार 886 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 6 हजार 663 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा - Corona Home Testing Kit : होम टेस्टिंग किट चाचणी गैर नाही, पण रिपोर्ट अपलोड करा - डॉ. मंगला गोमारे