मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 30 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे, आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 30 हजार 535 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 24 लाख 79 हजार 682 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 314 जणांनी कोरोनावर मात केल्याने, राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 22 लाख 14 हजार 867 वर पोहोचली आहे. तर राज्यात सध्या परिस्थितीमध्ये 2 लाख 10 हजार 120 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.15 टक्के एवढे आहे.
राज्यातील या भागांमध्ये झाली सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 3,779
ठाणे- 303
ठाणे मनपा- 666
नवी मुंबई-467
कल्याण डोंबिवली- 764
उल्हासनगर-124
मीराभाईंदर-179
वसई विरार-144
रायगड-144
पनवेल मनपा- 295
नाशिक-794
नाशिक मनपा-1,666
अहमदनगर- 498
अहमदनगर मनपा-256
धुळे- 186
धुळे मनपा - 180
जळगाव- 1126
जळगाव मनपा- 368
नंदुरबार-324
पुणे- 1093
पुणे मनपा- 2,978
पिंपरी चिंचवड- 1,350
सोलापूर- 220
सोलापूर मनपा- 184
सातारा - 326
औरंगाबाद मनपा-1400
औरंगाबाद-314
जालना-521
परभणी-130
परभणी मनपा-122
लातूर मनपा-200
लातूर 167
उस्मानाबाद-106
बीड -335
नांदेड मनपा- 879
नांदेड-474
अकोला- 232
अकोला मनपा-399
अमरावती- 185
अमरावती मनपा- 140
यवतमाळ-370
बुलडाणा-568
वाशिम - 298
नागपूर- 918
नागपूर मनपा-2,747
वर्धा-376
भंडारा-121
चंद्रपूर-179