मुंबई - अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महाविकास आघाडीचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात पवार यांनी, राज्यातील बेरोजगारांसाठी 'महाराष्ट्र शिकाऊ प्रोत्साहन योजना' या नव्या योजनेची घोषणा केली आहे.
हेही वाचा... महा'अर्थ' संकल्प : जलसंधारणासाठी 'मुख्यमंत्री जलसंधारण योजना'
राज्यातील बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. या प्रश्नावर अर्थसंकल्पात अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी, स्थानिक उमेदवारांना ८० टक्के रोजगार देण्यासाठी कायदा करणार असल्याचे सांगितले.
राज्यात महाराष्ट्र शिकाऊ प्रोत्साहन योजना राबवणार...
18 ते 28 वर्षे वयोगटातील बेरोजगारांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेतून १० लाख तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात येणार असून योजनेसाठी 6 हजार कोटी खर्च अपेक्षीत आहे. येत्या 15 ऑगस्ट 2020 पासुन या योजनेची सुरुवात होणार आहे.