माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण
आज अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केला युक्तिवाद
न्यायाधीश एम जी जमादार यांनी जामीन अर्जावर निकाल ठेवला राखून
अनिल देशमुख यांना जामीन देण्यात येऊ ईडीचा वतीने युक्तिवाद
आर्थिक गैरव्यवहार प्रकरण हे एखाद्या मर्डर केस प्रमाणेच गुन्हा आहे, असा युक्तवाद ईडीच्यावतीने करण्यात आला
Breaking News Live : अनिल देशमुखांच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण.. ईडीचा जामिनाला विरोध, म्हणाले गैरव्यवहार हा मर्डरप्रमाणेच - आजच्या ताज्या बातम्या
17:04 September 28
अनिल देशमुखांच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण.. ईडीचा जामिनाला विरोध, म्हणाले गैरव्यवहार हा मर्डरप्रमाणेच
15:48 September 28
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार बोनसची मागणी, आयुक्तांसोबत बैठक संपन्न
मुंबई: महानगर पालिका कर्मचाऱ्यांना यंदा २५ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. पालिका कर्मचारी संघटना आणि आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आज बैठक झाली या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. येत्या २ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत बैठक होईल अशी माहिती कर्मचारी संघटना कृती समितीचे प्रकाश देवदास यांनी दिली. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस दिला होता. त्याआधीच्या वर्षी कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला होता.
14:22 September 28
पंकजा मुंडे नाराज असल्याच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे म्हणाले...
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातल वंशवादी संपवायचा आहे. मात्र, ते मला संपवू शकणार नाहीत." पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर तिथेच पंकजा मुंडे हे आपल्याच पक्षात नाराज ( Pankaja Munde upset with BJP? ) आहेत का ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे..
13:01 September 28
लतादीदींचं वर्णन करायला 'ऋषितुल्य' हाच शब्द - राज ठाकरे
दीदींचं गाणं वरवर सोपं वाटावं पण ते तितकंच कोणालाच पूर्ण गवसू नये इतकं मोठं. अशा अमूर्ताचं दर्शन होणं,आयुष्यात सर्वोच्च काय असतं हे पाहणं आणि ते अनुभवणं हे भाग्य मला लाभलं हाच माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद. दीदींचं वर्णन करायला 'ऋषितुल्य' हाच शब्द मलातरी सुचतोय - राज ठाकरे
12:38 September 28
ठाकरे गटाकडून ठाणे शहरात 200 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या

एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरासाठी शिवसेनेची नवी रणनीती...
शिवसेना ठाकरे गटाकडून ठाणे शहरात 200 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या...
तीन विधानसभा क्षेत्र नियुक्त्या
कोपरी, पचपाखाडी, ओवळा, माजीवाडा आणि ठाणे शहर
संपर्क प्रमुख, उपजिल्हा प्रमुख,गट प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या नियुक्त्या...
शिंदे यांचा ठाणे शहर हा बालेकिल्ला छेदण्याचा ठाकरे गटाची रणनीती..
जुन्या शिवसैनिकांबरोबर तरुण शिवसैनिकांना ठाकरे यांच्या सेनेकडून संधी...
आगामी निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून नवी रणनीती...
11:53 September 28
वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर वकिलाने घातली गाडी
नालासोपारा - नालासोपाऱ्यात वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर भरधाव वेगात दुचाकी घालून तिला दुचाकीस्वाराने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे . या घटनेत महिला पोलिसाच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. वाहतूक महिला पोलीस प्रज्ञा दळवी या सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पाटणकर पार्क येथील गोडाऊनवर असताना हा प्रकार घडला आहे..आरोपी हा वकील असून ब्रजेशकुमार भेलौरिया असं त्याचे नाव आहे..
11:24 September 28
बच्चू कडूंना राग अनावर; कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली
अमरावती - आमदार बच्चू कडू विविध कारणांनी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते. यादरम्यान अमरावतीच्या गणोजा गावात बच्चू कडू एका कामाच्या उद्घाटनासाठी आले असताना रस्त्याच्या कामकाजासंदर्भात त्यांचा वाद झाला. इतक्यातच त्यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
11:12 September 28
हा देशभक्तांचा देश, PFI बंदीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
मुंबई - 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या पीएफआयला देशात अशा घोषणा देण्याचा अधिकार नाही. त्यावर गृह मंत्रालय कारवाई करेल. केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. हा देशभक्तांचा देश आहे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
09:47 September 28
हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक - घराच्या शेजारीच असलेल्या पाण्याचा हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ७ वाजता नाशिक शहरातील आगर भागातील पंचकृष्ण बंगला,रुम नंबर 10 येथे हा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.भद्रकाली पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
09:47 September 28
दुधाळा शिवारात गांजाची शेती; तीन लाख रुपयाची गांजाची झाडे जप्त
हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा तांडा शिवारात शेतकऱ्याने शेतात लावलेली गांजाची तीन लाख रुपयाची झाडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले आहेत.
08:54 September 28
देश विरोधी कारवाई करणाऱ्यांना या भूमीत इंच भरही जागा भेटणार नाही, हा संदेश मोदींनी विश्वाला दिला - राम कदम
मुंबई - शिवसेना कोणाची याबद्दलचा सर्वोच्च न्यायालयामध्ये वाद सुरू आहे. कालच निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू ठेवावी याबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा शिवसेनेला झटका मानला जातो. दरम्यान, मुंबईच्या संरक्षणासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या ग्रामदैवतेचे काल रात्री दर्शन घेतले आणि आदिशक्तीकडे मुंबईच्या संरक्षणाची आणि सर्वांना सुखी करण्यासाठीची प्रार्थना केली.
08:54 September 28
आदित्य ठाकरेंनी घेतले मुंबईच्या ग्रामदैवतेचे दर्शन; मुंबईच्या संरक्षणासाठी केली प्रार्थना

08:53 September 28
दक्षिण कोकणसह कोल्हापूर संरक्षित क्षेत्रात ८ वाघांचे अस्तित्व, ट्रॅप कॅमेऱ्याने टिपल्या हालचाली
सातारा - कोकणमार्गे कोल्हापूर संरक्षित क्षेत्रात संचार करणाऱ्या ८ वाघांचे दर्शन जीवशास्त्रज्ञांना कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून घडले आहे. त्यापैकी वाघाची एक जोडी दक्षिण कोकणातील मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जंगलात कायमस्वरुपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.
08:00 September 28
महाविकास आघाडीची लवकरच होणार महत्त्वाची बैठक, आगामी निवडणुकांसाठी घेणार निर्णय
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसात होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर अद्यापही महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही. ही बैठक 29 सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक अजून काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीतून राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा होणार आहे.
08:00 September 28
फोर्टिफाईड तांदूळ राज्यात वितरीत करणार; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई - राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज संमती दिली. केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यात तीन टप्प्यात ही योजना राबवणार आहे. पहिला टप्पा हा मार्च 2022 पर्यंत राज्याच्या महिला व बालविकास व शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आला आहे.
08:00 September 28
नेपाळी समाजाने जाळला अरविंद सावंत यांचा पुतळा
ठाणे - ठाण्यात बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे चंपासिंह थापा यांनी एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यानी त्यांच्यावर अतीशय कडवट शब्दात टीका केली होती. यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीही नाराजी वक्त केली होती. याचा विरोध म्हणून ठाण्यातील इंदिरा नगर येथील नेपाळी समाजाने सेना खासदार अरविंद सावंत यांचा पुतळा जाळत निषेध आंदोलन केले.
06:44 September 28
पीएफआयवर पाच वर्षाची बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) आणि त्याच्या सहयोगी संस्थांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
06:30 September 28
विमान जमिनीवरच; अमरावतीकरांना दहा वर्षापासून दाखवले जात आहे हवेत झेप घेण्याचे स्वप्न
अमरावती - विमानतळावरून सहा महिन्यात विमान आकाशात झेप घेणार असे गत दहा वर्षांपासून अमरावतीकरांना स्वप्न दाखविले जात आहे. राज्यातील अनेक छोट्या शहरात विमानसेवा सुरू झाली असताना विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीत अद्यापही विमानसेवाचा पत्ता नाही. राजकीय मंडळींचे विमानतळा संदर्भात आश्वासन गगन भरारी घेत असताना विमान मात्र अद्यापही जमिनीवरच असल्याचे वास्तव आहे.
06:30 September 28
मुंबई उपनगरात भाजपला गळती, बड्या नेत्याच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई - महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई उपनगरात भाजपला गळती लागली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई जिल्हा भाजप उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिघे यांनी शिवबंधन बांधल्यानंतर आणखी एका बड्या नेत्याच्या मुलाचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. उपनगरात भाजपचे वर्चस्व आहे. शिवसेनेकडून त्याला सुरुंग लावण्यात येत असल्याने येत्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात चुरस वाढली आहे. भाजप नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे सुपुत्र निरव बारोट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. '
06:30 September 28
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे फरक पडत नाही, शिवसैनिक गद्दारांना त्यांची जागा दाखवतील - अंबादान दानवे
नवी मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर तसेच पक्षचिन्ह धनुष्यबाणावर केलेल्या दाव्याबाबत कार्यवाहीस निवडणूक आयोगाला ग्रीन सिग्नल दिला आहे. आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे काहीही फरक पडणार नाही फक्त न्यायालय बदललं आहे, अशी प्रतिक्रया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. दुर्गामातेत रावणाप्रमाणे दुष्प्रवृत्ति असलेल्यांचा नाश करण्याची शक्ति आहे. शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केलेल्या गद्दारांचा नाश करण्याची ताकत शिवसैनिकांना द्यावी अशी प्रार्थना दुर्गेचरनी केल्याचे दानवे म्हणाले.
06:08 September 28
MAHARASHTRA BREAKING NEWS
मुंबई - गुन्हे शाखेने मुंबईतील 3 ठिकाणी 7 गोदामांवर छापे टाकले आणि परदेशातून कालबाह्य कॉस्मेटिक उत्पादने आयात केल्याप्रकरणी 1 व्यक्तीला अटक केली आणि 3.28 कोटी रुपयांची उत्पादने जप्त केली. आरोपी कालबाह्य उत्पादनांच्या तारखेचे स्टिकर लावायचे आणि त्यांची पुन्हा विक्री करायचे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली.