ETV Bharat / city

Breaking News Live : टीईटी घोटाळा....मला हटवण्यासाठी हे ब्लॉकमेलिंग -अब्दुल सत्तार - आजच्या लेटेस्ट न्यूज

Breaking News
ब्रेकिंग न्यूज फाईल फोटो
author img

By

Published : Sep 22, 2022, 6:40 AM IST

Updated : Sep 23, 2022, 5:37 PM IST

23:00 September 22

टीईटी घोटाळा....मला हटवण्यासाठी हे ब्लॉकमेलिंग फक्त तो 2024 च्या आधीच 2022 ला केला..अब्दुल सत्तार

टीईटी घोटाळा....मला हटवण्यासाठी हे ब्लॉकमेलिंग फक्त तो 2024 च्या आधीच 2022 ला केला..अब्दुल सत्तारBody:पुणे:- राज्य सरकारच्या वतीने मुस्लिम समाजच सर्वेक्षण करण्यात येणार आहे याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारलं असता ते म्हणाले की सच्चर कमिटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचा पहिला सर्वेक्षण करण्यात आला होतं.त्यानंतर कोणत्याही प्रकारच सर्वेक्षण करण्यात आलं नव्हत.प्रत्येक समाजात गरिबी असून प्रत्येक सामजाच सर्वेक्षण व्हायला पाहिजे.म्हणून आत्ता मुस्लिम समाजच सर्वेक्षण होत आहे.अस यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले.

22:59 September 22

वीज केंद्रातील घोटाळ्याची आता न्यायालयीन लढाई, 2015 पासून 595 प्रकल्पग्रस्तांची होणार चौकशी?

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 188 प्रकल्पग्रस्तांपैकी तब्बल 100 जण हे बोगस असल्याचे पडताळणीअंती समोर आले. सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांच्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. ही आकडेवारी केवळ एक वर्षाची आहे. मात्र हा घोटाळा मोठा असून 2015 पासून तब्बल 595 प्रकल्पग्रस्तांची भरती वीज केंद्रात करण्यात आली आहे. याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्धार धोटे यांनी केला आहे. यात मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे या घोटाळ्यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहे

22:59 September 22

माजी मंत्री नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणीची पाहणी करण्याकरिता समिती गठीत कार ईडीची सत्र न्यायालयात अर्ज

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय तपासणी करिता समिती स्थापन करण्यात यावी याकरिता आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये केळीच्या वतीने वकील सुनिल गोन्सालवीस यांनी अर्ज केला आहे नवाब मलिक हे गेल्या अनेक महिन्यांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून यासंदर्भात या वैद्यकीय समितीच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी असे ईडीच्या वतीने अर्जात म्हटले आहे. या अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे

22:58 September 22

पेण अर्बन बँक घोटाळेबाजांचे संघर्ष समिती श्राद्ध घालणार

पेण अर्बन बँक घोटाळ्याला एक तप पूर्ण झाले असून 12 वर्षानंतरही न्याय न मिळाल्याने पेण अर्बन बँक संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत बँक बुडव्या घोटाळेबाजांचे श्राद्ध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

22:58 September 22

हिरे व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या त्रिकुटास अटक, क्राइम ब्रांच युनिट 12ची कारवाई

हिरे व्यापाऱ्यास ब्लॅकमेल करून त्याच्याकडून ८०लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना क्राइम ब्रांच युनिट १२ ने अटक केली आहे विजय हिरप्पा, रवी गोगारी, किसन सुराय्या अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ३ कोटीं ५ लाख रुपयाचे डायमंड हस्तगत करण्यात क्राईम ब्रांच १२ला यश आले आहे

22:57 September 22

केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईतील कागदपत्रे सामान्य लोकांसमोर मांडावेत - प्रकाश आंबेडकर

पुणे - आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आणि आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं. असे आवाहन केंद्रीय तपास यंत्रणांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

22:57 September 22

टिआरपी प्रकरणांमध्ये रिपब्लिक टिव्ही विरोधात कोणतेही पुरावे नाही ईडीचा आरोप पत्रात माहिती

ठाकरे सरकारच्या काळामध्ये गाजलेल्या टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात ईडी कडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमधून खाजगी न्यूज चैनल रिपब्लिक टीव्ही विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसल्याचे आरोप पत्रामध्ये म्हटले आहे. मात्र चायनल विरोधात अद्याप तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या या कारवाई विरोधात मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. या प्रकरणात नुकतेच ईडीच्या वतीने आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.B

22:57 September 22

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने पतीने सुपारी देऊन केला खून

नवी मुंबई- प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने सुपारी देऊन पतीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर आढळला होता अनोळखी महिलेचा मृतदेह

22:56 September 22

कुख्यात गुंडाने येरवडा कारागृहातून लोणंदच्या व्यापाऱ्याला मागितली ५० लाखांची खंडणी

येरवडा कारगृहात असलेल्या कुख्यात गुंड परवेझ हनिफ शेख याने कारागृहातून पत्र पाठवून लोणंदमधील गॅस एजन्सी मालकाला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख याच्याविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.Body:सातारा - येरवडा कारगृहात असलेल्या कुख्यात गुंड परवेझ हनिफ शेख याने कारागृहातून पत्र पाठवून लोणंदमधील गॅस एजन्सी मालकाला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख याच्याविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

18:11 September 22

शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरचबीकेसी मैदान केवळ वाहनांच्या पार्किंगसाठी

मुंबई - शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शिंदे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्धार शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला. राज्यभरातून येणाऱ्या वाहनांकरिता बीकेसी मैदानाची जागा राखीव ठेवण्यासाठी परवानगी घेतल्याचे पावसकर यांनी सांगितले.

17:10 September 22

उमेश कोल्हे खून प्रकरणात आरोपी शैम अहमदला १ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

उमेश कोल्हे खून प्रकरणात आरोपी शैम अहमदला १ ऑक्टोबरपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

16:58 September 22

देशात एनआयएचे विविध राज्यांत छापे, १०६ पीएफआयच्या सदस्यांना अटक

आंध्र प्रदेश (5), आसाम (9), दिल्ली (3), कर्नाटक (20), केरळ (22) अशा 11 राज्यांमध्ये NIA, ED आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने टाकलेल्या अनेक छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 106 PFI सदस्यांना अटक करण्यात आली आहे. , एमपी (4), महाराष्ट्र (20), पुडुचेरी (3), राजस्थान (2), TN (10) आणि उत्तर प्रदेश (8) अशी अटकेतील सदस्यांची संख्या आहे.

15:43 September 22

औरंगाबादच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

औरंगाबाद - बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध बिल्डर आणि क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल माधवराव अग्रहारकर (वय ५५) रा. मित्र विहार कॉलनी उल्कानगरी यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेने बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार अनिल अग्रहारकर आज सकाळी झोपेतून उठले आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांनी दोरीच्या साह्याने आत्महत्या केली. सकाळी सात वाजे सुमारास ही घटना उघडकीस आली.

15:20 September 22

चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन वाइल्डलाइफ गुडविल महाराष्ट्रची ब्रँड अॅम्बेसेडर

महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सायंकाळी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. ज्यामध्ये टॅक्सीडर्मी सेंटर, अॅनिमल हॉस्पिटल, कॅट ओरिएंटेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे, याशिवाय वन विभागाला 8 रेस्क्यू अॅम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत. गस्तीसाठी वन कर्मचाऱ्यांना 40 मोटारसायकली देण्यात आल्या. याशिवाय चित्रपटांमध्ये जादुई अभिनयाने सर्वांना संमोहित करणारी चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन हिला वाइल्डलाइफ गुडविल महाराष्ट्रची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आली आहे. यावेळी रवीना टंडन प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, वन्यजीवांना अधिक सुरक्षित आणि चांगले बनवण्यासाठी पूर्ण निष्ठेने प्रचार करणार आहे.

14:04 September 22

अनिल परब यांचा रिसॉर्ट दिवाळीपर्यंत जमीनदोस्त होणार - किरीट सोमय्या

मुंबई : शिवसेना नेते, माजी परिवहन मंत्री अनिल परब (Shiv Sena leader Anil Parab) यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात तोडक कारवाई (Anil Parab Dapoli resort demolition action) सुरू होऊन दिवाळी पर्यंत तो जमीनदोस्त केला जाईल, असा दावा भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya pointer Anil Parab on Dapoli Resot) यांनी केला आहे. आज ते दापोली दौऱ्यावर (Kirit Somaiya Dapoli tour) आहेत. याप्रसंगी ते बोलत होते. (Latest News from Mumbai)

14:03 September 22

मुख्यमंत्री अहोरात्र काम करत असल्याने, दररोज घ्यावा लागतोय सलाईनचा डोस : केसरकर यांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र काम करीत ( CM Eknath Shinde is Working Round A Clock ) असतात. पहाटे चार वाजेपर्यंत सलग काम करीत असलेल्या एकनाथ शिंदे यांना दररोज सलाईनचा डोस घ्यावा लागत असल्याचा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर ( Minister Kesarkar Secret Blast ) यांनी केला आहे.

13:14 September 22

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून तीन ट्रेन बुक; सर्वसामान्य प्रवाशांची होणार गैरसोय

मुंबई : पैसे देऊन पैठण मधील शिंदे गटाच्या ( shinde group ) सभेला गर्दी जमवल्याचा आरोप झाल्यानंतर आता जळगाव मधून तीन ट्रेन बुक करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक ट्रेनसाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तब्बल ७५ लाख रुपये मोजण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचा खटाटोप ( Gathering crowds for the Dussehra melava ) शिंदे गडाकडून सुरू झाला असला तरी सर्वसामान्य प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.

13:14 September 22

जालन्यातही ATS ची कारवाई, अब्दुल हादी अब्दुल रौफला ठोकल्या बेड्या

जालना - आज एटीएसनं देशभरातील पीएफआय ( PFI ) या संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जालन्यातील अब्दुल हादी अब्दुल रौफ ( ATS Raid In Jalna ) याला जळगावमधून ताब्यात घेण्यात आलंय.अब्दुल हादी अब्दुल रौफ ( Abdul Hadi Abdul Rauf ) हा अनेक वर्षापासून पीएफआय या संघटनेचं काम करतो. रौफ हा मूळ जालन्यातील नेर सेवलीतील रहिवासी असून तो संघटनेच्या जालन्यातील सोशल मीडियाचं काम पाहत असल्याची माहिती समोर आलीय. यामुळे एकच खळबळ उडालीय.

13:13 September 22

एटीएसने केली मिरज अन्सारीला नांदेडमधून अटक

नांदेड - आज सकाळी नांदेडमध्ये दशतवाद विरोधी पथकाने ( Anti-statism squad ) पीएफआयच्या कार्यकर्ताला देगलूर नाका ( terror funding case ) परिसरातुन ताब्यत घेतले आहे. मिरज अन्सारी ( Miraj Ansari arrested ) असे ताब्यात घेतलेय व्यक्तीचे नाव आहे. त्याचे देगलूर नका इथे किरण दुकान आहे अशी, माहिती मिळाली आहे.

12:05 September 22

NIA, ED आणि ATS च्या कारवाईत कोल्हापुरातील एकजण ताब्यात

कोल्हापूर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि दहशतवादी विरोधी पथक (ATS) यांनी एकत्रितपणे आज देशभरातील विविध राज्यांमध्ये छापीमारी करून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) सदस्यांना यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्रातील 20 जणांचा यामध्ये समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये कोल्हापुरातील सुद्धा एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरातील एकूण दहा राज्यांमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरातील जवाहरनगर येथील अब्दुल मौला मुल्ला याला ताब्यात घेण्यात आले आहे. याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेब्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मौला याच्या घरासमोर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. सध्या अब्दुल मौला याच्या फ्लॅटला मात्र सकाळपासून कुलूप लावल्याने बंद आहे. पहाटेच कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

11:15 September 22

दादर रेल्वे स्टेशन येथील सिग्नलमध्ये बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मुंबई - आज सकाळीच मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानक दादर येथे सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक आणि लांब पल्ल्यांच्या गाड्याचं वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सिग्नलमधील बिघाड आता दूर करण्यात आला आहे. मात्र, लोकल वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील मार्गस्थ झाल्या आहेत. सकाळी आठच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे उपनगर दिशेला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला होता. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली. तसेच सकाळच्या वेळी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहचायला देखील त्यामुळे उशीर झाला.

11:15 September 22

शिवाजी पार्क प्रकरणात शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका

स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली याचिका

दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची याचिकेत मागणी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्या करिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा

10:05 September 22

पुण्यात पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर एनआयएची छापेमारी

पुणे:- पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( पीएफआय) मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयए ने छापेमारी सुरू केली आहे.एनआयए आणि ईडीने टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याप्रकरणी देशभरातील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले. आज सकाळी पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथील पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर छापेमारी करत काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडी देखील दाखल झाली आहे.

09:04 September 22

दसरा मेळाव्याला यंदा शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? हायकोर्टात आज सुनावणी

मुंबई : शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) अखेर ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने (Shiv Sena) हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कुणाचा असणार? आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

08:28 September 22

एनआयए आणि ईडीची सर्वात मोठी कारवाई; दहशतवाद कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 100 जणांना अटक

नवी दिल्ली - एनआयए आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या तपास प्रक्रियेत अनेक ठिकाणी शोध घेत आहे. दहशतवादाला आर्थिक मदत करणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवणे यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि अधिकृत परिसरात एनआयएने छापे मारले आहेत. यात 100 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे.

08:21 September 22

सिग्नलमध्ये बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई - दादर स्टेशनवर सिग्नल सुरू करताना तांत्रिक समस्या. मेन लाइनवर गाड्या उशिराने धावत आहेत. कर्मचारी/अधिकारी यात सहभागी होत आहेत आणि लवकरच निराकरण केले जाईल, अशी माहिती सीपीआरओ सीआर, शिवाजी सुतार यांनी दिली.

07:39 September 22

राज्यातील पोलीस पाटलांना महागाईच्या झळा; मानधनांत वाढ करावी, अन्यथा उपोषणाचा इशारा

मुंबई - राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्या गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मिळणारे अनुदान ही तुटपुंजे असल्याने वाढत्या महागाईच्या झळा पोलीस पाटलांना सोसाव्या लागत आहेत. राज्य सरकारने अनुदान वाढवून द्यावे, अन्यथा आंदोलन अथवा उपोषण करू, असा इशारा राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेने दिला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी मंत्रालयात भेटीसाठी आले होते. मात्र, त्यांची भेट न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

07:14 September 22

शिवसेना नेते संजय राऊत यांचे आर्थर रोड जेलमध्ये 50 दिवस पूर्ण

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली होती. सध्या संजय राऊत 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी ईडीने अटक केल्यानंतर आजपर्यंत संजय राऊत यांना कारागृहामध्ये 50 दिवस पूर्ण झाले आहेत.

07:13 September 22

दोन पोलीस अडकले अँटी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : एखादी अनुचित घटना घडली की आपण पोलिसांकडे धाव घेतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी त्यांच्याकडे तक्रार नोंदवतो. बरेचदा पोलीस तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्यास आपण त्यांच्याकडे गुन्हा नोंद घेण्यासाठी आग्रही असतो. पण येथे मात्र प्रकरण थोडे वेगळे आहे. या ठिकाणी नोंद असलेला गुन्हा हटवण्यासाठी दोन पोलिसांनी लाच मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

07:13 September 22

आता पुण्यात ई - बाईक मिळणार भाड्याने; पुणे पालिकेचा अभिनव उपक्रम

पुणे - एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला आत्ता दुचाकीच शहर म्हणून ओळखलं जातं. आता याच पुणे शहरात ई बाईक भाड्याने मिळणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने पुण्यातील प्रकल्प आणि ईव्ही-चार्जिंग स्टेशनचे उभारणीसाठी मान्यता दिली आहे.

06:36 September 22

नवरात्रीत वाढतीये काँडंमची विक्री

ठाणे - महाराष्ट्र आणि देशभरात गणेशोत्सव , दहीहंडी हे उत्सव तर मोठ्या प्रमाणात साजरे होतातच मात्र सर्वाधिक ओढ असते ती नवरात्रीची. नवरात्री निमित्त सर्व धर्मीय नागरिक एकत्र येत असतात. त्याच प्रमाणे नवरात्रीत अनेक गोष्टींना ग्राहकांची पसंती मार्केटमधे पाहायला मिळत असते. गुजराती पेहराव , दांडिया , अश्या अनेक गोष्टींना मागणी वाढत असतानाच. याच नवरात्रीत काँडमची विक्री पण विक्रमी होत असल्याचं मेडिकल स्टोअर्स विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

06:23 September 22

MAHARASHTRA BREAKING NEWS : महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज वाचा ईटीव्ही भारतवर

सांगली - पत्नीसोबत चारित्र्य संशयातून झालेली भांडणामधून थेट अडीच वर्षाच्या मुलाचा एका बापाने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फरशीवर आपटुन हा निर्दयी खून करण्यात आला आहे. आयुष सावंत,असे मृत चिमुरड्याचे नाव असून या प्रकरणी अर्जुन सावंत याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 23, 2022, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.