ETV Bharat / city

Maharashtra Breaking : मुख्यमंत्र्यांविरोधात महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह टीका; ठाकरे गटाच्या अर्धा डझन नेत्यांवर नौपाड्यात गुन्हा - Shiv sena Thackeray group

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news
author img

By

Published : Oct 11, 2022, 6:55 AM IST

Updated : Oct 11, 2022, 10:23 PM IST

22:21 October 11

मुख्यमंत्र्यांविरोधात महाप्रबोधन यात्रेत आक्षेपार्ह टीका; ठाकरे गटाच्या अर्धा डझन नेत्यांवर नौपाड्यात गुन्हा

ठाणे - गडकरी रंगायतन येथे नुकत्याच झालेल्या महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील अर्धा डझनहुन अधिक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या वरीष्ठ नेत्यावर आता कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महाप्रबोधन करणे हे ठाकरे गटातील नेत्यांना महाग पडले असल्याची चर्च सद्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

21:41 October 11

भारतीय नागरिकत्वाचे बनावट कागदपत्र बनवून मुंबईत राहणाऱ्या आठ बांगलादेशी आरोपींना चार वर्षाची शिक्षा

मुंबई - भारतीय नागरिकत्वाचे बनावट कागदपत्र भरून मुंबईत रहिवासी असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने आठ वर्षाची शिक्षा आज सुनवली आहे. एटीएस कडू 2018 मध्ये मिळालेल्या माहिती च्या आधारे छापेमारी केल्यानंतर या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

21:41 October 11

कोल्हापुत ढगफुटीसदृश्य पाऊस; रस्त्यांवर पाणीच पाणी

कोल्हापूर : कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागात आज पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सकल भागांसह शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गांधीनगर वळीवडे तसेच पन्हाळा भागाला सुद्धा पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पावसाने रिपरिप सुरूच ठेवली होती.

21:41 October 11

दिवाळीत ऑफर भुलून ऑनलाइन शॉपिंग करताय तर सावधान

मुंबई: जसजसे इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत आहे. तसे दिवसेंदिवस सायबर क्राईमचं जाळे वाढत आहे. अशातच आता दिवाळी तोंडावर आली आहे. यादरम्यान, नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, सजावटीच्या वस्तू, घरात नव्या वस्तू, पणत्या आदी वस्तूंची घरबसल्या गर्दीत न जाता ऑनलाईन दिवाळीसाठी खरेदी करणं पसंत करतात. अशावेळी लोकांनी सावधान राहणं गरजेचं आहे. कारण दिवाळीच्या सणात सायबर ठग फसवणुकीसाठी तयार आहेत. यासाठी ईटीव्ही भारतशी सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी ग्राहकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे, आणि ऑनलाईन शॉपिंग करताना काय सतर्कता बाळगायची याबाबत माहिती दिली आहे.

20:51 October 11

कोल्हापुरात भर पावसात मशाल हातात घेत ठाकरे गटाचे शक्ती प्रदर्शन

कोल्हापूर - उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावरील दाव्याच्या वादामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे यांना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे पक्षाचे नाव मान्य करत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांचे शिवसेना या नावास मान्यता देत तलवारढाल असे चिन्ह दिले आहे.मात्र ठाकरे गटा कडून आज कोल्हापुरात भर पाऊसात मशाल हतात घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे.

20:51 October 11

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पत्नीला महिना 90 हजार देण्याचे पतीला दिंडोशी न्यायालयाचं आदेश

मुंबई - सासरच्या कुटुंबियांकडून होत असलेल्या अत्याचारानंतर पत्नीवर होत असलेल्या अत्याचार पती केवळ प्रेक्षक म्हणून पाहत होता, असे निरीक्षण नोंदवत कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पतीने पत्नीला प्रति महिना 90 हजार रुपये देण्याचे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे. कौटुंबिक हिंसाचारात पीडित पत्नीचे पती खासगी गुंतवणूक वित्त फर्ममधील सहाय्यक उपाध्यक्षा या पदावर कार्यरत आहे.

पीएफआयच्या सदस्यास मुक्त करण्याचा कोर्टाचा आदेश

सोलापूर- सप्टेंबर महिन्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर देशभर कारवाया झाल्या होत्या.सोलापुरातील या संघटनेच्या सदस्यास विजापूर नाका पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत असिफ शौकत शेख(वय 40 वर्ष,रा सहारा नगर,सोलापूर) यास 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अटक केले होते.नवरात्र उत्सव,दसरा,कोजागरी पौर्णिमा,ईद ए मिलाद सार्वजनिक उत्सवाचे कारण समोर करत ,पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.कनिष्ठ न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत 6 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. 6 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ करत, 11 तारखेपर्यंत ज्यूडीशियल कोठडीत रवानगी केली होती. आरोपीच्या वकिलांनी वरीष्ठ कोर्टात अर्ज करून जामीनसाठी अर्ज केला होता. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी असिफ शेख याची मुक्तता केली आहे.

19:56 October 11

ATS महाराष्ट्राने शेख उमर शेख हबीबला जालना येथून केली अटक

जालना - बेकायदेशीर कारवाया केल्याबद्दल पीएफआय सदस्यांविरुद्ध नोंदवलेल्या 4 एफआयआरच्या संदर्भात ATS महाराष्ट्राने शेख उमर शेख हबीब नावाच्या एका आरोपीला जालना येथून अटक केली. त्याची 15 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. महाराष्ट्र एटीएसने ही माहिती दिली.

19:55 October 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन

उज्जैन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे नव्याने बांधलेल्या महाकाल कॉरिडॉरचे ( Mp Mahakaal Corridor ) उद्घाटन केले. भगवान शिवाची प्रतिकात्मक सृष्टी याठिकाणी निर्माण केली आहे. त्याचे दर्शन भाविकांना घेता यईल. तर शहराच्या अर्थव्यवस्थेत 300 कोटी रुपयांचे योगदान ( Rs 300 Crore To Tourism Economy ) यामुळे मिळणार आहे. उज्जैनचे महाकाल मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

18:16 October 11

बेस्ट कंत्राटी कामगार आंदोलन

मुंबई - बेस्टमधील कंत्राटी चालकांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली सोमवारी ओशिवरा आगारा नंतर आज मंगळवारी वडाळा डेपोमध्ये आंदोलन करण्यात आले. उद्या बुधवारी शिवाजी नगर आगारात आंदोलन केले जाणार असल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.

17:48 October 11

भारतीय जनता पार्टीची ढाल आणि गद्दारीची तलवार शिंदे गटाच्या निशाणीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

मुंबई - भारतीय जनता पार्टीची ढाल आणि गद्दारीची तलवार अशी खरमरीत टीका शिंदे गटाच्या निशाणीवर केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

17:35 October 11

शिंदे गटाला मिळाली ढाल तलवार

नवी दिल्ली - शिंदे गटाला मिळाली ढाल तलवार. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने ढाल आणि तलवारीचे चिन्ह दिले आहे.

17:16 October 11

मशाल केवळ मातोश्रीपुरती पेटणार - आमदार रवी राणा

अमरावती - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. मात्र ही मशाल केवळ मातोश्री पुरताच उजेड देऊ शकणारी आहे. राज्यामध्ये शिंदे यांचा सूर्य तळपत राहील आणि तो विकास करत राहील अशी प्रतिक्रिया स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे.

17:07 October 11

उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना फोन

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना फोन केला. अंधेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा दिल्याने त्यांनी सोनियांचे आभार मानले.

16:42 October 11

डी कंपनीच्या नावाने हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी मागणारे आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर सुनावणी सुरू

मुंबई - डी कंपनीच्या नावाने हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांची सुनावणी सुरू झाली आहे. मुंबई पोलीस हफ्ता विरोधी पथकातर्फे खंडणी प्रकरणात अटक अजय गोसालीया, समीर खान, फिरोज चमडा, अमजद रेडकर सोबतच रियाज भाटी आणि सलीम फ्रुट याना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले आहे. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार आहे. एकूण 7 आरोपीना आज सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका कोर्टात हजर करण्यात आले आहे. सदर आरोपींवर व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

16:12 October 11

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना दिलेल्या जामीना विरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत ईडीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

15:51 October 11

बीड भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या

बीड - येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली.

15:26 October 11

अजगराने पूर्ण शेळीच केली गिळंकृत

नांदेड - नांदेडमध्ये एका अजगराने शेळीवर हल्ला करून पूर्ण शेळीच गिळंकृत केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंढी या गावाच्या शिवारातील ही घटना आहे. ज्ञानेश्वर घंटेवाड हा शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी चोंडी गावाच्या शिवारात गेला होता. त्यावेळी ही घटना घडली.

15:09 October 11

बीसीसीआयची निवडणूक बिनविरोध होणार - रॉजर बिन्नी अध्यक्ष

मुंबई - सौरव गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. तर जय शाह सचिवपदी राहतील आणि गांगुलीच्या जागी आयसीसी बोर्डात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील. राजीव शुक्ला हे उपाध्यक्ष, अरुण सिंग धुमाळ आयपीएलचे अध्यक्ष, आशिष शेलार नवे कोषाध्यक्ष, देवजित सैकिया नवे सहसचिव असतील. 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या एजीएममध्ये बिन्नी अधिकृतपणे बीसीसीआयचा पदभार स्वीकारतील. कोणत्याही पदासाठी निवडणूक होणार नाही कारण सर्व उमेदवार बिनविरोध निवडले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

15:06 October 11

मशाल घेऊन महाराष्ट्रात नाही तर देशात क्रांती करू - अंबादास दानवे

अमरावती - मशाल घेऊन महाराष्ट्रात नाही तर देशात क्रांती करू अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमरावतीमधील ग्रुप जयस्तंभ येथे दिली. ते मेळघाटाच्या आणि विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

14:46 October 11

बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचचे पथक नाशिक आणि कोल्हापूरसाठी रवाना

मुंबई - बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचचे 1 पथक नाशिक आणि कोल्हापूरसाठी रवाना झाले आहे. प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट 8 चे 1 पथक रवाना झाले. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र करून अधिक शिवसैनिक असल्याचा दावा केला जातोय, असा आरोप शिंदे गटानं केला होता. काल हे प्रकरण निर्मल नगर पोलिसांकडून गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले होते. एकट्या निर्मल नगरमध्ये 4683 बोगस प्रतिज्ञापत्रे केल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

14:40 October 11

सलमान खानच्या याचिकवर निर्णय राखून ठेवला

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानच्या याचिकवर निर्णय राखून ठेवला. पनवेलमधील सलमानचा शेजारी केतन कक्कडच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद संदेश पोस्ट केल्याबद्दल याचिका दाखल केली होती. त्याला प्रतिबंधात्मक आदेशाची मागणी केली होती. या याचिकेवरील आदेश कोर्टाने राखून ठेवले आहेत.

14:21 October 11

अमरावतीसह संपूर्ण विदर्भात पाऊस

अमरावतीसह संपूर्ण विदर्भात पाऊस
अमरावतीसह संपूर्ण विदर्भात पाऊस

अमरावती - अमरावतीसह संपूर्ण विदर्भात पाऊस कोसळतो आहे. येत्या 36 तासात काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तीन दिवस पाऊस राहील असा अंदाज आहे. हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंडे यांनी ही माहिदी दिली आहे.

13:34 October 11

येणारी निवडणूक स्वबळावर लढायची आहे - राज ठाकरे

मुंबई - येणारी निवडणूक स्वबळावर लढायची आहे असे राज ठाकरेंनी मेळाव्यात मेळाव्यात स्पष्ट केले आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील. आपल्याकडे आता ५ महिने आहेत. तुमचं पाॅझीटीव्ह माईंड असलं पाहिजे. राज्यातील राजकारण खालच्या थराला जातंय. पेरलं जातंय ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार. मी स्वतः बसणार नाही असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

13:28 October 11

रॉजर बिन्नी हे सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष होण्याची

मुंबई - माजी भारतीय क्रिकेटपटू आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी हे सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तर भाजपचे आमदार आशिष शेलार कोषाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

13:22 October 11

बारमध्ये तर्र झालेल्या ग्राहकाला सुरक्षित घरी पोहोचवण्याची जबाबदारी बारची

पणजी - बारमधील एखादा ग्राहक मद्यधुंद अवस्थेत असल्यास तो सुरक्षित घरी परतेल याची खात्री करणे ही बारची जबाबदारी आहे असे मत गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो यांनी मांडले आहे. यासंदर्भात गोव्यातील बारशी संपर्क साधेन असे ते म्हणालेत.

12:25 October 11

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास राज्य सरकार तयार

मुंबई - 2020 पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास महाराष्ट्र सरकारने सहमती दाखवली आहे. एका प्रतिज्ञापत्रात, महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की ते सीबीआयकडे तपास सोपवण्यास तयार आहेत. त्यावर सरकारचा कोणताही आक्षेप नाही.

11:42 October 11

तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई - सांताक्रूझ पोलिसांनी एका तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी आणि बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याबद्दल फिनाईल पिण्यास भाग पाडल्याप्रकरणी 307 आणि 34 अन्वये 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १ आरोपी अटक तर २ फरार आहेत. गंभीर जखमी झालेल्या तृतियपंथीयाला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

10:19 October 11

बारामती ॲग्रो लिमिटेडवर गुन्हा दाखल करण्याची भाजप नेते राम शिंदे यांची मागणी

विधानपरिषदेचे आमदार भाजपा नेते राम शिंदे यांनी बारामती ॲग्रो लिमिटेड, साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य साखर आयुक्तकडे मागणी केली आहे. त्याने दिलेल्या पत्रात खालील बाबी नमूद करून राज्य साखर आयुक्ताने कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे हा साखर कारखाना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे याच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे.

09:25 October 11

नागपुरात आज ढगाळ वातावरण , हलका पाऊस होण्याची शक्यता

नागपूर विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत साधारणपणे ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे.

08:56 October 11

एनआयएने दहशतवादी फंडिंग प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये टाकले छापे

एनआयएने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी फंडिंग प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

08:43 October 11

764 साबण पॅकमध्ये ठेवलेले 9 किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त

मिझोरामच्या 7 व्या बटालियन आणि बीएसएफच्या कचार फ्रंटियर आणि करीमगंज पोलिसांनी 764 साबण पॅकमध्ये ठेवलेले 9 किलोपेक्षा जास्त हेरॉईन न्यू करीमगंज रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग 37 वर एका ट्रकमधून जप्त केले आहेत. एका अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे.

08:28 October 11

छोटा शकीलच्या नावाने पाच कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल

मुंबई - छोटा शकीलच्या नावाने पाच कोटींची मागणी करण्यात आली. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

08:04 October 11

खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातून सुरू केली भारत जोडो यात्रा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हर्थीकोट गावातून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली. कन्नियाकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या यात्रेने आतापर्यंत ८६७ किमीचे अंतर कापले आहे. एकूण 12 राज्यांतून यात्रा जम्मू आणि काश्मीरमध्ये संपेल.

07:32 October 11

माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर आज सैफई गावात होणार अंत्यसंस्कार

समाजवादी पक्षाचे सुप्रीमो आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर आज सैफई गावात त्यांच्या वडिलोपार्जित घरी अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मुख्यमंत्री अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

07:15 October 11

एकबालपूर परिसरात कलम 144 लागू

9 ऑक्टोबर रोजी दोन वेगवेगळ्या समुदायातील लोकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर एकबालपूर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

07:14 October 11

सुवर्ण मंदिर सरोवरात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकाच्या रांगा

गुरु रामदास यांच्या जयंतीनिमित्त सुवर्ण मंदिर सरोवरात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने रांगा लावल्या.

07:10 October 11

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना केले आश्चर्यचकित

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुंबईतील जलसा निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. कारण ते त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री बाहेर पडले.

06:45 October 11

Maharashtra Breaking news and update बारामती ॲग्रो लिमिटेडवर गुन्हा दाखल करण्याची भाजप नेते राम शिंदे यांची मागणी

मुंबई उद्धव ठाकरे गटाने नवीन चिन्हासह नवीन पक्षाचे नाव असलेले पोस्टर जारी केले. उद्धव ठाकरे गटाला, ( Shiv sena Thackeray group ) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच निशाणी म्हणून मशाल देण्यात आली ( ECE allotted new symbol to Shiv sena ) आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ( Eknath Shinde ) बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ( Andheri East Assembly Elections ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता, आतापर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष ( Thackeray vs BJP ) पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट ( Thackeray vs Shinde group ) असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता, ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर शिंदे गट देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती.

Last Updated : Oct 11, 2022, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.