ETV Bharat / city

Breaking : कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही - चंद्रकांत पाटील

Breaking News
Breaking News
author img

By

Published : Sep 5, 2021, 10:42 AM IST

Updated : Sep 5, 2021, 7:06 PM IST

18:58 September 05

अन्य कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती करणार नाही - चंद्रकांत पाटील

पुणे - यापुढे कुठलीही निवडणूक जे आमचे सहयोगी पक्ष आहेत, त्यांच्याबरोबरच लढणार आहोत. अन्य कुठल्याही मोठ्या पक्षाबरोबर आम्ही युती करणार नाही. कारण आमच्याबरोबर राहून आमच्या मताच्या आधारे दुसऱ्याशी बार्गेनिंग करून विश्वासघात केल्याचे आम्हाला चालणार नाहीे. यापुढे आम्ही आमच्या ताकतीवर विजयी होऊ, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

16:24 September 05

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली पंचगंगा नदीत उडी

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेआंदोलनकर्ते नृसिंहवाडी येथे येताच आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत उडी घेतली आहे. आपत्ती दलाच्या जवानांनी शेतकऱ्यांना वाचवले. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे.

15:53 September 05

अनंत चतुर्दशीच्या आधीच मिळणार रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेचा मुंबई विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता यावा, यासाठी सप्टेंबर महिन्याचा पगार अनंत चतुर्दशीच्या आधीच मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

12:34 September 05

कोरोनाच्या काळात देशापेक्षा महाराष्ट्र शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य यंत्रणा उभारली आहे. लसीकरण वेगाने सुरू आहे. तरीही यात सर्वांचे योगादन महत्त्वाचे आहे. हे रण संपणार आहे की नाही याबाबत टास्क फोर्सने मार्गदर्शन करावे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

12:34 September 05

गणेश उत्सव दिवाळी हे सण येत आहेत.  गेल्या वर्षी सणासुदीच्या दिवसानंतर कोरानाची लाट आली तोपर्यंत आपण पहिल्या लाटेला नियंत्रणात ठेवले होते. मात्र यंदा गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरियंटने संपूर्ण जग व्यापले आहे. वाहतुकीच्या माध्यमातून त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.  नवीन व्हेरियंटच्या तपासणीसाठी यंत्रणा उभारली असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

12:34 September 05

राजकारण करू नका राजकारण आपलं होतं, जीव जनतेचा जातो. आंदोलन झालेच पाहिजे पण ते कोरोना विरोधत असावे असा टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आंदोलन करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.  प्रत्येकाने कुटुंबाची काळजी घ्यायला हवी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा

12:34 September 05

डेंग्यू आणि मलेरिया प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. डेंग्यू आणि मलेरियामध्ये पूर्वी सारखी लक्षणे दिसत नाहीत. हे दोन्ही आजार घातकच आहेत, त्यामुळे या आजाराचे खातरजमा करणे आवश्यक असल्याचेही ठाकरे म्हणाले.

12:34 September 05

बेड वाढवण सोपं आहे ऑक्सिजन देऊ शकतो का हा मोठा प्रश्न आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत तसे चित्र निर्माण होऊ द्यायचा नसेल काळजी घ्यायला हवी, औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरले. त्यामुळे उद्योगधंदे बंद करण्याची वेळ आली असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

कोरोनाला रोखण्यासाठी आपण राज्यात झपाट्याने व्हॅक्सिनेशन करतोय, तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत, कोरोनाची दाहकता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.

12:34 September 05

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने आपल्याला धडा शिकवला आहे.  आजपर्यंत आपण काय शिकलो याचा एक आढावा घ्यायला हवा. त्यातून प्रत्येक पाऊल आपल्याला सावध टाकायला हवे. मात्र हे सगळे सुरु असताना आपण एकीकडे काळजी घेत असताना काहींना हे उघडा, ते उघडा अशी घाई लागली आहे. परंतु ज्या गोष्टी उघडलेल्या त्या पुन्हा बंद होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगत ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.

12:17 September 05

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -  गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टरांनी आपल्याला जपले आहे.  सर्वांच्या प्रयत्नामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.  जगात तिसऱ्या लाटेचा अनुभव येत आहे. त्यामुळे आपल्या राज्यात तिसरी लाट येऊ नये  यासाठी प्रयत्न करायला हवा. लाटे येण्यापूर्वीच तिचा सामना कऱण्यासाठी शस्त्र परजून ठेवायला हवेत. ऑक्सिजनची निर्मिती होते पुरेसा साठा होतोय.  प्रत्येक आरोग्य यंत्रणांची तपासणी करणे ऑडिट करणे गरजेचे असून खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिकच्या ऑडिट करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

11:53 September 05

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीत काही तरुण बुडाल्याची माहिती पुढे येत आहे

नागपूर -  नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे कन्हान नदीच्या काठावर असलेल्या "अम्माची दर्गा" या ठिकाणी 5 जण बुडाले असल्याची प्राथमिक माहिती..

मिळालेल्या माहितीप्रमाणे यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातून सुमारे दहा जण अम्माची दर्गा या ठिकाणी होत असलेल्या उरुसमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते..

त्यापैकीच पाच जण आज सकाळी नदीत बुडाल्याची माहिती आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे सर्वजण सकाळी आंघोळ करायला नदीत उतरले. मात्र खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाच जण बुडाले आहेत..

अजूनही मृतदेह हाती लागलेले नाहीत शोध कार्य सुरू आहे.

11:26 September 05

कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट महाभयंकर होती, पश्चिम महाराष्ट्राला ऑक्सिजनची सर्वाधिक गरज

कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट महाभयंकर होती.  संपूर्ण राज्यात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येत आहेत. ऑक्सिजन स्टोरेजची व्यवस्था वाढवण्यासाठी राज्यशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी अधिक भर दिला जात आहे. तसेच राज्यात सध्या  पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजनची गरज असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे  यांनी दिली. ते माझा डॉक्टर या ऑनलाईन परिषदेत बोलत होते.  टॅक्सिंग लॅप्स मुबलक प्रमाणात असून राज्यात बेडची क्षमताही आहे.

राज्यात सध्या सहा कोटी 15 लाख लसीकरण झाले आहे. दोन्ही डोस झालेले दीड कोटीच्या घरात आहेत. तिसऱ्या संभाव्य लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार तयारीत आहे. फॅमिली डॉक्टरांनी योग्य तपासणी करावी, तसेच लक्षणे आढळल्यास कोविड टेस्ट करण्याच्या सूचना रुग्णांना द्याव्यात असे आवाहनही कुंटे यांनी डॉक्टरांना केले आहे.  येणारे संकट आपण कसे तरी होऊ शकतो यावर भर द्यायला हवा.

10:25 September 05

नरसिंहवाडीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. नरसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 5, 2021, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.