ETV Bharat / city

Maharashtra Breaking News : शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट - Etv Bharat breaking news

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Aug 5, 2022, 6:40 AM IST

Updated : Aug 5, 2022, 9:56 PM IST

21:50 August 05

शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

14:19 August 05

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई जिल्हा बँकेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची अध्यक्षपदी निवड

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई जिल्हा बँकेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.

14:01 August 05

आरे वन परिसरात कारशेडसाठी कोणतीही झाडे तोडली नाहीत- एमएमआरसीएलचा दावा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) सर्वोच्च न्यायालयाला कळवले की मुंबईतील आरे वन परिसरात मेट्रो कारशेड बांधण्यासाठी कोणतीही झाडे तोडली जात नाहीत.

13:59 August 05

पेटीएमची सेवा ठप्प, वापरकर्ते त्रस्त

अनेक वापरकर्त्यांसाठी पेटीएम डाउन आहे. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

13:58 August 05

राहुल गांधींसह काँग्रेस खासदार दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांना पोलीस लाइन्स किंग्सवे कॅम्पमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आज देशव्यापी निदर्शने करत आहे.

13:30 August 05

हे हुकूमशाही सरकार घाबरले आहे- राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. हे हुकूमशाही सरकार घाबरले आहे. भारताच्या स्थितीवरून, महागाई आणि ऐतिहासिक बेरोजगारीपासून, आपल्या धोरणांनी आणलेल्या नाशातून. जो सत्याला घाबरतो तो आवाज उठवणाऱ्यांना धमकावतो!

13:26 August 05

राहुल गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

13:24 August 05

राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत तहकूब

राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

13:23 August 05

मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रंजित रंजन यांच्यासह काँग्रेस खासदार ताब्यात

मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रंजित रंजन यांच्यासह काँग्रेस खासदारांना दिल्लीतील पोलीस लाईन्स किंग्सवे कॅम्पमध्ये ताब्यात घेण्यात आले.

13:21 August 05

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांना दिल्लीतील AICC मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतले. त्या बेरोजगारी आणि महागाईच्या निषेधार्थ पक्षाच्या इतर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सामील झाल्या होत्या. पक्षाने आज देशव्यापी आंदोलन पुकारले आहे.

13:21 August 05

सीबीआयने पारादीप पोर्ट ट्रस्टच्या मुख्य यांत्रिक अभियंत्याला केली अटक

सीबीआयने पारादीप पोर्ट ट्रस्टच्या मुख्य यांत्रिक अभियंत्यासह इतरांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. सुरुवातीला पाच लाख रुपये वसूल करण्यात आले. त्यानंतर आणखी १८.३ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. गुन्ह्याची कागदपत्रे आणि 20.2 लाख रुपयेही सापडले.

12:36 August 05

दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

12:24 August 05

वर्षा राऊत यांच्या समन्सवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

वर्षा राऊत यांच्या समन्सवर संजय राऊत यांचे प्रतिक्रिया

आने दो आने दो सबको आने दो मनात संजय राऊत ईडी कार्यालयात रवाना

शिवसेना नेते संजय राऊत यांची वैद्यकीय चाचणी जेजे रुग्णालयात केल्यानंतर पुन्हा ईडी दाखल

संजय राऊत यांना विचारण्यात आले की वर्षा राऊत यांना देखील चौकशी करिता ईडीने बोलवले आहे

12:20 August 05

पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा

शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात

पैठण तालुक्यात बंडखोरीनंतर शिंदे गटाने फडकवला झेंडा,

वडगाव कोल्हाटी येथे ग्रामपंचायत मधे पहिल्या सत्रात १७ पैकी ५ जागांवर आ संजय शिरसाट गट विजयी

12:19 August 05

बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

12:18 August 05

कायदेशीर प्रक्रियेचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे: राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू

आधिवेशन चालू असताना किंवा अन्यथा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचे समन्स खासदार टाळू शकत नाहीत. कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून कायदा आणि कायदेशीर प्रक्रियेचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे: राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू

11:49 August 05

आम्ही लढत आहोत-काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा

महागाई मर्यादेपलीकडे वाढली आहे. त्यासाठी सरकारला काहीतरी करावे लागेल. त्यामुळेच आम्ही लढत आहोत, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले आहे. महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशभरात निदर्शने केली आहेत.

11:48 August 05

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांचे महागाई आणि बेरोजगारीविरोधात संसदेत आंदोलन

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांच्या महागाई आणि बेरोजगारीविरोधात संसदेत आंदोलन केले आहे.

11:09 August 05

मल्लिकार्जुन खरगे यांनी परिधान केला काळा कुर्ता आणि पगडी परिधान

  • Delhi | Leader of Opposition in Rajya Sabha Mallikarjun Kharge wears a black kurta and turban in protest against price rise and unemployment pic.twitter.com/bWs2AxMweI

    — ANI (@ANI) August 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काळा कुर्ता आणि पगडी परिधान केली.

11:09 August 05

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी संसदेत सर्वोच्च मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, प्रल्हाद जोशी, अनुराग सिंह ठाकूर हे पंतप्रधानांच्या भेटीला उपस्थित होते.

11:07 August 05

एफटीआयआय शिकणाऱ्या मुलाने केली आत्महत्या, शेवटच्या वर्षांचा फिल्मचा विद्यार्थी असल्याची माहिती

- डेक्कन पोलीस घटनास्थळी

- आत्महत्येच कारण समजू शकलं नाही

10:49 August 05

पोलिसी बळाचा वापर करून राजभवनावरील काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा

अनेक कार्यकर्त्यांची धरपकड

महागाई बेरोजगारी विरोधात आज राजभवनावर आहे आज काँग्रेसचे आंदोलन

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलन करणार

10:29 August 05

राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी "एजन्सींचा गैरवापर आणि विरोधी पक्षांना दडपण्याचा सरकारकडून केलेला प्रयत्न असा मुद्दा उपस्थित केल्यावर सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

10:24 August 05

धर्मादाय ट्रस्टद्वारे चालवल्या जाणार्‍या 'सराय' वर जीएसटी नाही-सीबीआयएससी

धार्मिक, धर्मादाय ट्रस्टद्वारे चालवल्या जाणार्‍या 'सराय' वर जीएसटी नाही. हे स्पष्टीकरण सीबीआयएससीने केले आहे.

10:21 August 05

आरबीआयकडून रेपो दर ५० बेसिस पाँईटने वाढ, कर्जाचे व्याजदर महागणार

आरबीआयकडून रेपो दर ५० बेसिस पाँईटने वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्जाचे व्याजदर महागणार आहेत.

10:21 August 05

10:04 August 05

4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालविले जात आहे- राहुल गांधी

लोकांचे प्रश्न - महागाई, बेरोजगारी, समाजातील हिंसाचार - उठवता कामा नये. सरकारचा हा एकमेव अजेंडा आहे आणि 4-5 लोकांचे हित जपण्यासाठी सरकार चालवत आहे आणि ही हुकूमशाही 2-3 मोठ्या व्यावसायिकांच्या हितासाठी 2 लोक चालवत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी नाव घेता मोदी व शाह यांच्यावर केली आहे.

10:03 August 05

लोकशाहीचा मृत्यू आपण पाहत आहोत-राहुल गांधी

लोकशाहीचा मृत्यू आपण पाहत आहोत. जवळपास शतकापूर्वीपासून सुरू झालेल्या भारताने जे बांधले आहे ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होत आहे. हुकूमशाही सुरू करण्याच्या या कल्पनेच्या विरोधात जो कोणी उभा राहतो त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, अटक केली जाते आणि मारहाण केली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

10:01 August 05

देशात हुकुमशाही सुरू-राहुल गांधी

काँग्रेसने ७० वर्षांत कमविलेले मोदी सरकारने ८ वर्षात गमविल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशात हुकुमशाही सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला.

09:42 August 05

वर्षा राऊत यांना उद्या हजर राहण्याचे ईडीचे समन्स

पत्रा चाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने उद्या, ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

09:38 August 05

आयएमडीकडून महाराष्ट्रासाठी तीव्र हवामानाचा इशारा

आयएमडीकडून महाराष्ट्रासाठी 4 दिवसांच्या तीव्र हवामानाचा इशारा येत आहे. 5 व्या दिवशी देखील तीव्र हवामान अलर्ट आहेत.

08:55 August 05

रुपल चौधरीला महिलांच्या 400 मीटरमध्ये कांस्यपदक

रुपल चौधरी (51.85 वैयक्तिक सर्वोत्कृष्ट) हिने महिलांच्या 400 मीटरमध्ये जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. एकाच U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय आहे. मिश्र रिले संघाला यापूर्वी रौप्यपदक मिळवण्यास तिने मदत केली आहे.

08:55 August 05

सुधीरचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

सुधीरने CWG2022 पॅरा-स्पोर्ट्स पदक मोजणीसाठी एक उत्तम सुरुवात केली आहे. तो मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आगामी सर्व प्रयत्नांसाठी त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.

08:16 August 05

बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करणार

बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करणार आहे. गेली काही दिवस संसदेच्या अधिवेशनात काँग्रेससह विरोधकांना महागाईचा मुद्दा लावून धरला आहे.

07:40 August 05

राहुल गांधी आज सकाळी साडेनऊ वाजता घेणार पत्रकार परिषद, ईडी कारवाईवर बोलण्याची शक्यता

आज सकाळी 9.30 वाजता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. सोनिया गांधी यांची ईडी चौकशी, नॅशनल हेराल्ड हाऊसमधल्या जप्तीच्या कारवाईबाबत ते बोलणार असल्याची शक्यता आहे.

06:59 August 05

मजुरांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा राज्यपालांनी केला निषेध

पुलवामा येथील मजुरांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांनी तीव्र निषेध केला आहे. मोहम्मद मुमताज यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. मी लोकांना आश्वासन देतो की या घृणास्पद हल्ल्यामागील लोकांना शिक्षा होईल, असे नायब राज्यपालांनी म्हटले आहे.

06:59 August 05

मॉल ऑफ अमेरिकामध्ये गोळीबार

मॉल ऑफ अमेरिकामध्ये गोळीबार झाला. ब्लूमिंग्टन, मिनेसोटामधील एमओए संशयित एमओएमधून पायीच पळून गेला. पीडितेचा शोध लागला नाही, असे ब्लूमिंग्टन पोलिसांनी म्हटले आहे.

06:58 August 05

केरळमध्ये मुसळधार पाऊस

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे कोट्टायम जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचले आहे.

06:58 August 05

चीनच्या क्षेपणास्त्रांमुळे जपान, तैवानकडून संतप्त प्रतिक्रिया

चीनी क्षेपणास्त्रे 'आमच्या राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणारी गंभीर समस्या आहे, असे जपानच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. दुसरीकडे तैवानला वेढा घालणाऱ्या चिनी लष्करी कवायतींनी परिस्थितीती बिघडवल्याचे तैवानच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

06:58 August 05

मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्याने अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित

युनायटेड स्टेट्सने मंकीपॉक्सचा उद्रेक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, की लसीचे वितरण वाढवणे, चाचणीचा विस्तार करणे आणि जोखीम असलेल्या समुदायांना शिक्षण देणे, यावर लक्ष देत आहोत. म्हणूनच विषाणूवरील आजची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषणा या उद्रेकाचा तातडीने सामना करण्यासाठी आवश्यक आहे.

06:58 August 05

वडोदऱ्यात तिरंगा मिठाई

हरघर तिरंगा मोहिमेला चालना देण्यासाठी वडोदरा येथील एका दुकानाने तिरंगा मिठाई बनवली आहे. वडोदरा महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत आमची बैठक झाली. यामध्ये आम्हाला या मोहिमेची माहिती मिळाली. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या मिठाई बनवण्यात आल्या आहेत, असे दुकानदाराने सांगितले.

06:58 August 05

मुख्तार अन्सारी यांचा न्यायालयाने फेटाळला जामिन अर्ज

लखनौच्या खासदार आमदार न्यायालयाने काल मऊ सदरचे आमदार आणि मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.ऑक्टोबर 2019 मध्ये लखनऊच्या महानगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

06:55 August 05

नवी दिल्ली जिल्ह्यात जंतरमंतर वगळता सर्व जिल्ह्यात जमावबंदी लागू

नवी दिल्ली जिल्ह्यातील जंतरमंतर वगळता संपूर्ण परिसरात कलम 144 सीआरपीसी लागू करण्यात आले आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे नवी दिल्ली जिल्ह्यातील ५ ऑगस्ट रोजी आंदोलनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीतील AICC मुख्यालयात रात्रीत जमले होते. कारण पक्ष आज महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांविरोधात देशव्यापी आंदोलन करणार आहे.

06:41 August 05

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरला सुवर्णपदक, श्रीशंकर मुरलीला रौप्यपदक

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुधीरचे अभिनंदन केले. लांब उडीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल ठाकूर यांनी श्रीशंकर मुरली यांचे अभिनंदन केले

06:21 August 05

Maharashtra Breaking News : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई जिल्हा बँकेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची अध्यक्षपदी निवड

मुंबई- शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ३५हून अधिक दिवस उलटले तरी मंत्रीमंडळात केवळ दोनच मंत्री आहेत. एकीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिले आहे. अशा परिस्थितीत मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. दुसरीकडे राज्यात अतिवृष्टी, सुस्तावलेले प्रशासन आणि विविध विभागांचे रखडलेले कामे यांचे आव्हान उभे ठाकलेले आहे.

Last Updated : Aug 5, 2022, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.