भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.
आज सर्वात महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे
दोन्ही बाजूने वैचारिक घुसळण होईल
युक्तिवाद होतील
शेवटी लोकशाहीचा विजय होईल
14:19 August 03
शेवटी लोकशाहीचा विजय होईल-भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय

13:21 August 03
आमदार अपात्रतेवर उद्या होणार सुनावणी, कामकाजात असणार पहिले प्रकरण- सर्वोच्च न्यायालय
शिंदे गटाचे वकील हरिश साळवे याचिका दुरुस्त करून दाखल करणार आहेत. तर आमदार अपात्रतेवर उद्या सुनावणी होणार आहे. कामकाजात पहिले प्रकरण असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
13:07 August 03
तुमची याचिका दुरुस्त करणार का? सर्वोच्च न्यायालयाची हरिष साळवेंना विचारणा
तुमची याचिका दुरुस्त करणार का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंना केली आहे.
13:02 August 03
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची नियमित वैद्यकीय चाचणी करून पुन्हा ईडी कार्यालयात दाखल

गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकरणात ईडी कडून करण्यात आली होती अटक
संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत कस्टडी देण्यात आली आहे
13:00 August 03
अमरावती येथे उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएने दोन आरोपी घेतले ताब्यात
अमरावती येथे उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे
अमरावतीमधून पुन्हा दोन आरोपी ताब्यात
भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर समर्थन दर्शवल्याने करण्यात आली होती हत्या
एनआयए लवकरच दोघांना अटक करून मुंबईत आणू शकते
12:49 August 03
आधी न्यायालयात कुणी आले, आधी तुम्हाला १० दिवसांचा वेळ दिला- सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने आधी न्यायलयात कुणी आले, असा प्रश्न शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंना उपस्थित केला. यावर साळवे यांनी प्रथम न्यायालयात आल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने १० दिवसांचा वेळ दिल्याचे म्हटले आहे.
12:38 August 03
नेतृत्वाची नवी स्पर्धा नसावी का, शिंदे गटाचे वकील साळवे यांच्याकडून युक्तीवाद
मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी नसलेले आणि बदल घडवणारे आमदार मोठ्या संख्येने असतील, तर नेतृत्वाची नवी स्पर्धा असावी असे ते का म्हणू शकत नाहीत? असा प्रश्न करत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी उपस्थित केला.
12:29 August 03
जर हे सर्व बेकायदेशीर असेल तर राज्य सरकारचे निर्णय बेकायदेशीर-कपिल सिब्बल
जर हे सर्व बेकायदेशीर असतील, तर महाराष्ट्र सरकारचे निर्णय बेकायदेशीर आहेत, रद्दबातल आहेत. लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे आहेत. हे प्रकरण तातडीचे आहे.
12:18 August 03
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी: शिंदे गटाकडून व्हीपचे उल्लंघन, कपिल सिब्बल यांचा दावा
मूळ पक्षाचे सदस्य असल्याने शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप बंधनकारक आहे. त्यांना पूर्ण पक्षावर मालकी सांगता येत नाही. नियमांचे उल्लंघन केल्याने ते अपात्र ठरतात, असा सिब्बल यांनी युक्तीवाद केला आहे.
12:03 August 03
निवडणूक प्रचारादरम्यान मोफतच्या घोषणांवर येणार नियंत्रण?
निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून देण्यात येणाऱ्या मोफत गोष्टींवर नियंत्रण कसे ठेवता येईल, यावर सूचना देण्यासाठी निती आयोग, वित्त आयोग, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, आरबीआय आणि इतर भागधारकांचा समावेश असलेल्या सर्वोच्च संस्थेची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
11:47 August 03
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात, बंडखोर शिंदे गट आणि शिवसेनेचे भवितव्य आज ठरणार
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. बंडखोर शिंदे गट आणि शिवसेनेचे भवितव्य आज ठरणार आहे.
11:36 August 03
ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची 415 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांचे 415 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त
डीएचएफएल आणि येस बँक फसवणूक प्रकरणात
आरोपी प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले आणि उद्योगपती संजय छाब्रिया यांची तात्पुरती मालमत्ता जप्त
11:32 August 03
पंढरपूर येथे रेल्वे मालगाडीनं चार मजूरांना उडवलं; दाेन मृत्यूमुखी, दाेघे गंभीर जखमी
पंढरपूर येथील रेल्वे स्टेशन नजीक टाकळी पुलाजवळील उड्डाण पुलाजवळ रेल्वेच्या धडकेत दाेघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य दाेघे जण जखमी झाले आहेत.जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.धडक दिलेली रेल्वे मालगाडी कुर्डूवाडीहून मिरज कडे जात होती.या घटनेत परप्रांतीय मजूर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
10:58 August 03
दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या चार कर्ज खात्यांची ईडीकडून चौकशी सुरू
:दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या चार कर्ज खात्यांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कोरेगावातील जरंडेश्वर आणि सांगली जिल्ह्यातील रायगावच्या डोंगराई कारखान्याच्या कर्ज खात्यांचाही चौकशीमध्ये समावेश आहे.Body:सातारा - दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या चार कर्ज खात्यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. चारपैकी दोन कर्ज खाती कोरेगावातील जरंडेश्वर आणि सांगली जिल्ह्यातील रायगावच्या डोंगराई कारखान्याची आहेत. ईडी आता साताऱ्यात पोहोचल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
10:55 August 03
स्पाइसजेटच्या काही शेअरची विक्री करण्यात येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
स्पाइसजेटचे प्रवर्तक अजय सिंह हे कंपनीच्या काही भागविक्रीची शक्यता तपासत आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
10:53 August 03
तामिळनाडूचा जीएसटी दरवाढीला विरोध
आम्ही जीएसटी दरवाढीला विरोध केला आहे. आमच्याकडे 140 देशांमधील सर्वात जटिल GST मॉडेल आहे. ज्यामध्ये हजारो त्रुटी आहेत. जीएसटी परिषद हा रबर स्टॅम्प असल्याची टीका तामिळनाडूचे अर्थमंत्री पी थियागा राजन यांनी केला.
10:24 August 03
विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती संबंधित मुद्यावर भेट घेणार आहेत. दुपारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक होण्याची शक्यता आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून पत्राद्वारे अजित पवार यांनी मागणी केली होती.
10:23 August 03
अमेरिकन नागरिकांनो विदेशात काळजी घ्या, बायडेन सरकारची सूचना
अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना उच्च पातळीची सतर्कता राखण्याची सूचना केली आहे.
09:37 August 03
आंध्र प्रदेशमध्ये वायू गळतीनंतर ५३ रुग्ण रुग्णालयात दाखल
आंध्र प्रदेशमध्ये वायू गळतीनंतर ५३ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. सर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतेक रुग्णांनी श्वास घेण्यास त्रास, मळमळ, उलट्या झाल्याची तक्रार केली: हेमंत, जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी, अनकपल्ले
09:20 August 03
जहांगीरपुरी दंगल प्रकरणातील वाँटेड गुन्हेगाराला अटक
जहांगीरपुरी दंगल प्रकरणातील वाँटेड गुन्हेगाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी त्याने इतर सहआरोपींसोबत जनतेला चिथावणी दिली. दंगलीनंतर अटक टाळण्यासाठी तो फरार झाला होता.
09:20 August 03
नवी दिल्लीत तिरंगा बाइक रॅली
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांनी लाल किल्ल्यावरून खासदारांसाठी तिरंगा बाइक रॅलीला झेंडा दाखवला. विजय चौकात या रॅलीची सांगता होईल
09:13 August 03
मुंबईतील किंग सर्कल भागात साचले पाणी
Maharashtra | Water logging in parts of Mumbai due to heavy rainfall in the city. Visuals from King Circle area pic.twitter.com/BusBheXtoR
— ANI (@ANI) August 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">Maharashtra | Water logging in parts of Mumbai due to heavy rainfall in the city. Visuals from King Circle area pic.twitter.com/BusBheXtoR
— ANI (@ANI) August 3, 2022

शहरात मुसळधार पावसामुळे मुंबईतील किंग सर्कल भागात पाणी साचले आहे.
08:52 August 03
आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशता यातील पर्याय- यूएस स्पीकर पेलोसी
आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशता यातील पर्याय आहे. तैवान आणि जगात लोकशाही टिकवून ठेवण्याचा अमेरिकेचा निर्धार कायम आहे, असे मत यूएस स्पीकर पेलोसी यांनी तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्या भेटीदरम्यान केले आहे.
08:51 August 03
'सराय' वर 12 टक्के जीएसटी लादण्यावर राज्यसभेत चर्चा करा, आपची मागणी
आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी श्री हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) अमृतसरच्या आजूबाजूच्या 'सराय' वर 12 टक्के जीएसटी लादण्यावर चर्चा करण्यासाठी राज्यसभेत कामकाज स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.
08:46 August 03
उदय सामंत ताफ्यावर हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई
उदय सामंत ताफ्यावर हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई केली आहे. बबन थोरात हिंगोलीचे संपर्कप्रमुख आहेत. बबन थोरात यांनी चिथावथोर भाषण केले होते. बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडा, या वक्तव्यानंतर पडसाद उमटायला सुरुवात झाल्याने पुणे पोलिसांनी मुंबईमधून बबन थोरातांना ताब्यात घेतले आहे.
08:15 August 03
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मायावती यांचा एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा
बसपा प्रमुख मायावती यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना त्यांच्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.
08:13 August 03
घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी पुकारला संप
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मध्यरात्री अज्ञात रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याने संप पुकारण्यात आला असून तीनशेहून अधिक निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
08:12 August 03
शिवसेनेला बदनाम करू नका-नीलम गोऱ्हे
बंडखोर आमदार आणि शिवसेना यातील वाद आता नव्या वळणावर येऊ ठेपला आहे. काल रात्री पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार उदय सामंत हे देखील जात असताना उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार नीलम ताई गोरे यांनी शिवसेनेला बदनाम करू नका अशी भूमिका मांडली आहे.
08:01 August 03
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख पुणे संजय मोरे यांना अटक
शिवसेना शहरप्रमुख पुणे संजय मोरे यांना उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्याआरोपावरू मध्यरात्री कोथरूड पोलीस स्टेशन कडून अटक करण्यात आली आहे. एक शिवसैनिक आणि शहराध्यक्ष अशा दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. उदय सामंत यांच्या ड्रायव्हरने पोलीस स्टेशनमध्ये गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.
07:28 August 03
संतप्त चीनने तैवानवर लादले व्यापार निर्बंध
यूएस स्पीकर पेलोसी यांच्या भेटीमुळे चिडलेल्या चीनने तैवानवर व्यापार निर्बंध सुरू केले आहे.
07:20 August 03
खलिस्तान समर्थकांना पिस्तूल पुरविणाऱ्या आरोपीला अटक
खलिस्तान समर्थकांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 21 देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती बुरहानपूरचे पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी दिली.
06:41 August 03
शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई-पंजाबचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले. उसाची सर्व प्रलंबित थकबाकी सरकार 7 सप्टेंबरपर्यंत भरून देईल. आंदोलनासाठी नोंदवलेले एफआयआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई 5 ऑगस्टपर्यंत दिली जाईल, अशीही घोषणाही त्यांनी केली.
06:38 August 03
एकेरीत सुवर्ण पदक मिळण्याची आशा - पीव्ही सिंधू
सुवर्णपदक चुकल्याचे थोडं दुःख झालं. मी माझ्या संघाला एक गुण दिला. पण तुम्ही काही जिंकता, काही हरता हा खेळाचा भाग आहे. इथून अनेक सकारात्मक गोष्टी घ्यायच्या आहेत. एकेरीत सुवर्ण पदक मिळण्याची आशा आहे, असे बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर शटलर पीव्ही सिंधू यांनी म्हटले आहे.
06:36 August 03
बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक
भारताने अंतिम फेरीत बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेत मलेशियाकडून 1-3 ने पराभूत होऊन रौप्य पदक जिंकले.
06:32 August 03
निंदनीय घटना, महाराष्ट्रात असे राजकारण होत नाही-उदय सामंत
निंदनीय घटना आहे. महाराष्ट्रात असे राजकारण होत नाही. त्यांच्याकडे बेसबॉल स्टिक्स आणि दगड होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा माझ्या पुढे जात होता. ते माझ्या मागे लागले होते की मुख्यमंत्री यांच्या.. याचा तपास पोलीस करतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार उदय सामंत यांनी दिली आहे.
06:31 August 03
हा हल्ला भ्याड, सर्वांनी शांतता राखावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हा हल्ला भ्याड आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल. सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. ते उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना बोलत होते.
06:15 August 03
Maharashtra Breaking News : शेवटी लोकशाहीचा विजय होईल-भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय
मुंबई- हडपसर येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घराकडे जात असताना उदय सावंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला करत गाडीची तोडफोड केली आहे. यावेळी कात्रज चौकात उदय सामंत यांच्या गाडीची मागची काच फोडली आहे. या घटनेचे पडसाद उमटले आहेत.