ETV Bharat / city

MAHA TET : ऑनलाइन अर्ज भरण्यास शिक्षकांना ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - maharashtra tet exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२१साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टेट
author img

By

Published : Aug 24, 2021, 8:15 PM IST

Updated : Aug 24, 2021, 10:17 PM IST

मुंबई - शिक्षण क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी तयार असलेल्या भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२१साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

३ लाख ५ हजार ८५० अर्ज

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यामध्ये १० ऑक्टोबरला टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत टीईटी परीक्षेच्या पेपर एक व पेपर दोनसाठी मिळून तब्बल ३ लाख ५ हजार ८५० अर्ज आले आहेत. तर अद्यापही एक लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून, त्यांनी अर्ज पूर्ण भरलेले नाहीत.

उमेदवारांची संख्या जास्त

उमेदवारांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या लक्षात घेऊन या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अर्ज करण्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे अर्ज प्रलंबित आहेत किंवा ज्यांनी अर्ज केला नाही, अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी परीक्षा परिषदेकडून ५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

दोन वर्षांनंतर परीक्षा

शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन गेल्या दोन वर्षात झाले नव्हते. सन २०१८-१९नंतर आता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख परीक्षार्थी ही परीक्षा देत असतात, परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे. परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

६ हजार १०० शिक्षकांची भरती

२०१९साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२०साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेता आल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाने यंदा ६ हजार १०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराची संधी उपलब्ध हावी, म्हणून टीईटी परीक्षेला मुदतवाढ दिली आहे.

Last Updated : Aug 24, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.