ETV Bharat / city

प्रियंका गांधींच्या समर्थनार्थ भाजपच्या नेत्या आल्या पुढे, गैरवर्तन करणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी - hasrath rape case

प्रियंका गांधी यांचा कुर्ता पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील हासरथ येथे अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. यावेळी एका अधिकाऱ्याने त्यांचा कुर्ता पकडल्याचे निदर्शनास आले.

Maha BJP vice president demands action against UP cop
'प्रियंका गांधींविरोधात गैरवर्तन केलेल्या पोलिसावर कारवाई करा'
author img

By

Published : Oct 5, 2020, 8:59 AM IST

Updated : Oct 5, 2020, 9:07 AM IST

मुंबई - भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रियंका गांधींसोबत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गांधी कुटुंबीय पीडितेच्या नातेवाईकांना भेटायला जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना विरोध करत धक्काबुक्की केली. यावेळी प्रियंका गांधी यांचा कुर्ता पकडल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर चित्रा वाघ यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • पुरुष पुलिस की जुर्रत कैसे हुई कि वो एक महिला नेता के वस्त्रों पर हाथ डाल सके!समर्थन मे अगर महीलाए आगे आ रही है पुलीस कही की भी हो उन्हे अपनी मर्यादा का ध्यान रखना ही चाहीए
    भारतीय संस्कृती मे विश्वास रखनेवाले मुख्यमंत्री @myogiadityanath जी ऐसे पुलीसवालोपर सख्त कारवाई करे @dgpup pic.twitter.com/RfbXiIIXcI

    — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वाघ यांच्या मागणीचे काँग्रेसी नेत्यांनी समर्थन केले आहे. चित्रा वाघ यांनी मागील वर्षी भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांना संस्कारांचा विसर पडला नसल्याचे काँग्रेसी नेत्यांनी सांगितले.

शनिवारी(3ऑक्टोबर) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसच्या पीडित कुटुंबीयांना भेट दिली. काही दिवसांपूर्वी एका मुलीचा सामूहिक बलात्कार झाल्याचे वृत्त येताच सर्वत्र राजकीय वातावरण गरम झाले. गांधी कुटुंबीय याच कुटुंबाची भेट घेण्याची मागणी करत होते. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखले. याचसोबत माध्यमांच्या उपस्थितीवरही मज्जाव करण्यात आला. गांधी कुटुंबीय हाथरसच्या दिशेने पुढे सरकत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी प्रियंका यांनाही पोलिसांनी डीएनडी टोल नाक्याजवळ धक्काबुक्की केली. त्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे.

Maharashtra BJP vice president Chitra Wagh
प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशात धक्काबुक्की झाली होती.

पुरुष पोलीस अधिकाऱ्याची एका राजकीय महिला नेत्याचे कपडे पकडण्याची हिंमत होतेच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांना त्यांच्या मर्यादेचे भान असावं, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपल्या संस्कृतीची जाण आहे. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केलीय. याचसोबत त्यांनी प्रियंका गांधींना जबरदस्तीने पकडल्याचा फोटोही शेअर केला आहे.

चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील त्यांची पाठराखण केली आहे. चित्रा वाघ जरी भाजपात गेल्या असल्या, तरीही त्या संस्कार विसरल्या नसल्याचे तांबे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गौतम बुद्धनगर पोलिसांनी प्रियंका गांधी यांची माफी मागितली असून या प्रकरणी तपास करण्याचे आश्वासन दिले आहे.

Last Updated : Oct 5, 2020, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.