मुंबई - राज्यात लंपी या आजाराने जनावरांचा मृत्यू ( Death of animals due to lumpy disease ) होत आहे. यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईत गाईंचे लसीकरण ( Vaccination of cows in Mumbai ) केले जाणार आहे. त्याचवेळी राणीबागेतील प्राण्यांना लंपी या ( Lumpy virus ) आजाराची लागण होऊ नये म्हणून गोठवलेले मांस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राण्यांची काळजी - राणीबागेत पेंग्विन ( Penguins in Ranibagh ) आणल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या काही वर्षात वाघ, बिबट्या, तरस आदी तीनशेहून अधिक प्राणी आणि पक्षी राणीबागेत आहेत. जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार ( Spread of corona virus around the world ) झाला असताना या प्राण्यांची विशेष काळजी राणीबाग ( Vir Jijamata Zoo Park ) प्रशासनाने घेतली होती. सध्या राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी आजाराचा प्रसार ( Prevalence of lumpy disease in Maharashtra ) झाला आहे. हा प्रसार राणीबागेतील प्रण्यांपर्यंत पोहचू नये यासाठी या प्राण्यांना गोठवलेले मांस खायला देण्याचा निर्णय घेतला आहे.
रोज ५० किलो मांसाची गरज - "वन्य प्राण्यांना खाण्यासाठी दररोज ५० किलो मांस लागते. लंपी रोग, ( Lumpy disease ) म्हशींच्या मांसाचा अभाव लक्षात घेऊन आम्ही गोठलेले मांस जनावरांना खायला देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अनेक एजन्सी आहेत ज्यांचा पुरवठा करतात. गोठवलेले मांस आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि आजपर्यंत आमच्याकडे मांसाचा एक आठवड्याचा साठा आहे. कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान गोठवलेले मांस विकत घेवून प्राण्यांना खायला दिले होते असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
महापालिका सतर्क - बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) देखील महाराष्ट्रात लंपी आजाराचा झपाट्याने होणारा संसर्ग लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. बीएमसी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक मुंबईतील विविध तबेले, गोठ्याला भेट देतील. गोठ्यात अस्वच्छता आढळल्यास गोठ्याच्या मालकांना नोटीस बजावली जाणार आहे. कोणत्याही प्राण्याला रोगाची लागण आढळल्यास बीएमसी वैद्यकीय उपचार देखील ( BMC will provide medical treatment if the animal is infected with disease ) करेल. २०१९ च्या गणनेनुसार ३२२६ गोवंशीय प्राणी आणि २४,३८८ म्हशी श्रेणीतील प्राणी आहेत. ३२२६ गोवंशीय प्राण्यांचे पालिका लसीकरण करणार आहे. महाराष्ट्रात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून गाय-बैलांच्या कत्तली आणि विक्रीवर बंदी आहे.