मुंबई - गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोरोना विषाणूचा मुंबईत प्रसार सुरू आहे. या दीड वर्षात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या आठ महिन्यात ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या आठ महिन्यात मुंबईत सर्वाधिक २ लाख ३३ हजार ५६३ रुग्ण आढळले होते. मात्र यानंतर मे महिन्यात ५७ हजार ६२७ रुग्णांपर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या जुलैमध्ये १२,५६३ पर्यंत झाली. तर ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या ९,३७४ पर्यंतखाली आली आहे.
हेही वाचा-गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सल्ला
रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली -
मुंंबईत गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेल्याने मुंबईत शेकडो ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाले. मात्र, पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आणि राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोना जानेवारी व फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात आला. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा दुसर्या लाटेत जानेवारीअखेर ३३४ पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या एपरील महिन्यात थेट ११ हजारांवर गेली होती. जुलै ऑगस्टपासून पुन्हा रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथील केल्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे.
हेही वाचा-घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
ऑगस्टमध्ये सर्वात कमी रुग्ण -
मुंबईत जानेवारी महिन्यात १५,५३३, फेब्रुवारी महिन्यात १६,९४६, मार्च महिन्यात ८८,७९९, एप्रिल महिन्यात २,३३,९१०, मे महिन्यात ५७,६२७, जून महिन्यात १५,९६७, जुलै महिन्यात १२,५६३, ऑगस्ट महिन्यात ९,३७४ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठ महिण्याची आकडेवारी पाहिल्यास ऑगस्ट महिन्यात सरावात कमी रुग्ण संख्या आढळून आली आहे.
हेही वाचा-corona update - राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, ४४५६ नवे रुग्ण; १८३ जणांचा मृत्यू
रुग्णदुपटीच्या कालावधीत चढउतार -
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. रुग्णसंख्या वाढू लागल्याने जानेवारीअखेर ५५९ दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी फेब्रुवारीत २४५ दिवस तर मार्चअखेर थेट ४९ दिवसांपर्यंत खाली आला होता. मे महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या कमी होत गेल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून ४३३ दिवसांवर पोहोचला. दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आली असताना रुग्ण दुपटीचा कालावधी १८ ऑगस्ट रोजी सर्वाधिक २०५७ दिवसांवर गेला होता. सद्यस्थितीत २००च्या खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे दुपटीने वाढला. मात्र, आता रुग्णदुपटीचा कालावधी पुन्हा १,५११ दिवसांवर आल्याने कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
गेल्या आठ महिन्यांतील रुग्णसंख्या -
जानेवारी - १५५३३
फेब्रुवारी - १६९४६
मार्च - ८८७९९
एप्रिल - २३३९१०
मे - ५७६२७
जून - १५९६७
जुलै - १२५६३
ऑगस्ट - ९३७४