मुंबई पन्नास खोके, चिडलेत बोके...... ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, महाराष्ट्र के गद्दारों को जुते मारो सालों को, गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो....ईडी सरकार हाय हाय... पैसा आमच्या जनतेचा, नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, गद्दार सरकारचा निषेध असो, सातवा वेतन न देणार्या सरकारचा धिक्कार असो, एसटी कर्मचाऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बलात्कारांचा सत्कार करणार्या सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी MLAs of Mahavikas Aghadi Raised Slogans Against Shinde Group विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात विधानभवन परिसर दणाणून सोडला.
महाविकास आघाडी आणि शिंदे गटाच्या आमदारांनी घेतले आवरते आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार Opposition Leaders Ajit Pawar आणि अंबादास दानवे Opposition leader Ambadas Danve यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काल घोषणाबाजीदरम्यान महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे गट व भाजप आमदार यांच्यात चांगलीच बचावाची झाली होती. आजही तशीच परिस्थिती होईल का, असे वाटत असताना दोन्ही कडच्या नेत्यांनी आज मात्र आवरते घेत आधी सत्ताधारी आमदारांनी आणि नंतर विरोधक आमदारांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
हेही वाचा MLA Aditya Thackeray तुमची किव येते, चला मीही राजीनामा देतो, आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान