मुंबई - सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. राज्यातही कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीतही पालिकेच्या रुग्णालयातील कर्मचारी घरीच आहेत. अशा कर्मचाऱ्यांना नोकरी नको असेल तर घरी बसवा, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना अपडेट लाईव्ह -
मुंबई - आज दिवसभरात राज्यात एकूण 2361 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर, आज 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 70, 019 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 2362 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे - आज दिवसभरात कोरोनाचे 57 नवीन रुग्ण, कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या 168 जणांना डिस्चार्ज, दिवसभरात कोरोनाचे 6 बळी
पुण्यातील आतापर्यंत मृतांचा आकडा 320, कोरोनाबाधित रुग्ण 6529. यातील बरे झालेले रुग्णसंख्या 3950 असून सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 2259 आहे.
औरंगाबाद - मराठवाड्यातून पहिली नियमित रेल्वे धावली आहे. सचखंड एक्स्प्रेस अडीच महिन्यांनी धावली आहे. यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात कुठेही उतरण्यास बंदी आहे. बुऱ्हाणपूरनंतरच्या थांब्यावर उतरण्याच्या सूचना प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. यातून जवळपास आठशे प्रवासी परराज्यात रवाना झाले.
मुंबई - पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्षवेधीत भाजप नेते आशिष शेलार यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र.
अकोला - महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; अकरा रुग्णांची कोरोनावर मात
रेल्वे कर्मचाऱ्यांचे विद्याविहार स्टेशनवर आंदोलन...
मुंबई- अत्यावश्यक सेवेसाठी चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनाही जागा मिळत नाही. गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणार कसे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे.
सातारा - जिल्ह्यातील 17 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
भंडारा - सोमवार दिवस जिल्ह्यासाठी लाभदायक, 8 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, तर एकही नवीन रुग्ण नाही