ETV Bharat / city

Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विधीमंडळात केले मतदान

Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विधीमंडळातील मतदान केंद्रात मतदान केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीए उमेदवाराला 200 मते मिळणार असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला

author img

By

Published : Jul 18, 2022, 11:17 AM IST

Updated : Jul 18, 2022, 12:21 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विधीमंडळातील मतदान केंद्रात मतदान केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीए उमेदवाराला 200 मते मिळणार असल्याचा दावा केला आहे. भारताच्या राष्ट्रपती पदाकरीता आज मतदान ( President Election ) होत आहे. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुक सध्या सुरू आहे. देशातील आमदार, खासदार यासाठी मतदान करत आहेत.

देशाच्या राष्ट्रपती पदाकरीता आज मतदान ( President Election ) होत आहे. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. देशातील आमदार, खासदार यासाठी मतदान करणार आहेत. सत्ताधारी भाजप आघाडीकडे 50 टक्क्यांहून अधिक मते असल्याने द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

65 टक्के मतदान - 65 टक्के मतदान झालं आहे. उर्वरित मतदान प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रपतीना चांगली मते मिळतील. २०० पेक्षा जास्त मत मिळतील. फडणवीस आणि शिंदे यांच डावपेचमुळे जास्त मत मिळतील. कोणत्याही पक्षाचा आमदार NDA ला मतदान करतील, असे शहाजी बापू यांनी यावेळी सांगितले आहे.

द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा यांच्यात लढत - राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. भारतातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हेच केंद्र सरकारचे प्रमुख असतात. या राष्ट्रपती पदासाठी आज देशभरात मतदान होत आहे. विविध राज्यांच्या विधिमंडळांमध्ये त्या त्या राज्यातील खासदार, आमदार आज मतदान करणार आहेत. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ( Yashwant Sinha ) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यातील आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांचा विजय होईल असे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांचा दावा - राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 165 आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे 15 मिळून ही संख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना 200 चा पल्ला गाठण्यासाठी आणखी 20 आमदारांची गरज लागणार आहे. यासाठी शिंदेंची नजर विरोधी बाकावर आहे असं बोललं जात आहे. शिंदे यांनी जर असा दावा केला असेल तर वरील 20 मतं ते कुठून आणणार याबाबत आता चर्चा सुरु आहे.

हेही वाचा - Voting For President Election Today : राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा आहेत उमेदवार

Last Updated : Jul 18, 2022, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.