मुंबई - राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने कहर सुरू केला आहे. दररोज सुमारे 45 हजारांच्या आसपास नव्या कोरोना रुग्णांची ( Corona in Maharashtra ) नोंद होते आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढल्यास राज्यातील धार्मिक स्थळे ( Religious Places will be Closed ) आणि दारूची दुकाने बंद करावी लागतील ( Liquor Shops Will be Close ), असा इशारा राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिला आहे. मात्र, यामुळे राज्य सरकारच्या महसुलात मोठी तूट येण्याची शक्यता आहे.
दरमहा विकली जाते दीड हजार कोटींची दारु - तळीरामांना आता दारूचा साठा करून ठेवण्याची गरज भासू शकते. कारण राज्यातील कोरोनाची स्थिती भयंकर होत असून दारूची दुकाने बंद केली जाऊ शकतात. राज्यात 4 हजार 159 दारुची अधिकृत दुकाने आहेत. त्यापैकी 1 हजार 685 परदेशी मद्याची दुकाने आहेत. 4 हजार 947 बिअर शॉपी तर 16 हजार परमिट रुम, बिअर बार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून राज्यात दरमहा सव्वा सात कोटी लिटर दारू विकली जाते. जीची किंमत सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
तळीरामांची गर्दी झाल्यास दुकाने बंद - राज्यातील दारूची दुकाने आणि धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय अद्याप राज्य सरकारने घेतलेला नाही. मात्र, तळीरामांची गर्दी जमावबंदी लागू असतानाही होतच राहिली तर राज्य सरकारला बंदी घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण अशा ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. राज्यातील धार्मिक स्थळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी खुली करण्यात आली होती. मात्र, यावरही आता निर्बंध लावण्याची गरज भासू शकते ( Religious Places will be Closed ) , असेही टोपे यांनी सांगितले.
ऑक्सिजनची मागणी वाढली - मागील दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांकडून ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली ( Oxygen Demand Increase ) आहे. 240 मेट्रिक टनाची मागणी आता 270 मेट्रिक टनावर पोहोचली आहे. तरीही चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. कारण कोरोनाच्या अत्यंत टोकाच्या काळातही मागणी सतराशे मेट्रिक टनांवर पोहोचली होती, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - Corona Restrictions In Maharashtra : मंत्रालयाचा कारभार पुन्हा ५० टक्क्यांवर, दोन शिफ्टमध्ये होणार कामकाज