ETV Bharat / city

Load Shedding : मंत्र्यांच्या बंगल्यांतील 'बत्ती गुल', मंत्र्यांना दुसऱ्यांदा फटका - Load Shedding

मुंबई शहरात रोजच वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीलाही बसला होता. मंगळवारी (दि. 17 मे) चक्क मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यावरील वीज पुरवठा खंडित झाला आहे. बत्ती गुल झाल्याने वीज खंडित होण्याचा प्रकाराचा फटका मंत्र्यांना दुसऱ्यांदा बसला आहे.

मंत्रालय
मंत्रालय
author img

By

Published : May 17, 2022, 7:32 PM IST

Updated : May 17, 2022, 9:15 PM IST

मुंबई - मुंबई शहरात रोजच वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीलाही बसला होता. मंगळवारी (दि. 17 मे) चक्क मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा खंडित झाला ( Lights Go Out on Ministers Bungalows ) आहे. बत्ती गुल झाल्याने वीज खंडित होण्याचा प्रकाराचा फटका मंत्र्यांना दुसऱ्यांदा बसला आहे.

रिसिव्हिंग स्टेशनला फॉल्ट - याबाबत बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधला असता, सकाळी 10 वाजता मरीन ड्राइव्ह रिसिव्हिंग स्टेशनला पहिला बिघाड आला होता. तो दुरुस्त करण्यात आला. आता सायंकाळी पुन्हा दुसरा बिघाड आला आहे. त्यामुळे मंत्रालय जवळील परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. 60 ते 70 टक्के वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला असून उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

मंत्रीमंडळ बैठकीतही बत्ती गुल - मागील आठवड्यात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 4 वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी या बैठकीत ऑनलाइन हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) व इतर मंत्री मंत्रालयातील 7 व्या मजल्यावरील सभागृहात बैठकीसाठी बसलेले होते. चर्चेअंती एकेक निर्णयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर ओबीसी आरक्षणाबद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली. 15 ते 20 मिनिटे झाली असतानाच अचानक वीज गेली. लगेच इन्व्हर्टरवर माइक व यंत्रणा सुरू झाली. पण, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला होता. परंतु प्रयत्न करूनही ते पुन्हा प्रस्थापित होऊ शकला नाही म्हणून ही बैठक आटोपती घेण्यात आली.

हेही वाचा - Right to alimony : नौकरी करणाऱ्या घटस्फोटीत पत्नीला पण पोटगीचा अधिकार

Last Updated : May 17, 2022, 9:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.