भारतीय शेअर बाजाराचे Indian stock market बिगबुल Bigbull of Indian stock market आणि भारताचे वॉरेन बफे Indias Warren Buffett म्हणूनही ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबादमधील मारवाडी कुटुंबात झाला. राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सामान्य शाळेतूनच केले. बी.कॉम आणि चार्टर्ड अकाउंटंट चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले. पुढे ते देशातील सर्वाधिक चर्चेत असलेले गुंतवणूकदार बनले. सध्या त्यांची एकूण संपत्ती ४.३ अब्ज डॉलर आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजे आज त्यांचे निधन Jhunjhunwala Life Journey झाले.
झुनझुनवाला यांचे बालपण राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी हैदराबादमधील मारवाडी कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव राधेश्यामजी झुनझुनवाला असे होते. तर आईचे नाव उर्मिला झुनझुनवाला आहे. त्यांची आई ही एक गृहीणी होती. आणि त्यांचे वडील भारत सरकारच्या आयकर विभागात अधिकारी होते आणि ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. राधेश्यामजी झुनझुनवाला हे शेअर बाजाराच्या विषयावर नेहमी मित्रांशी चर्चा करत असे. राकेश हे या सर्व गोष्टी ऐकत असे. अवघ्या 14 वर्षांचे असतांना त्यांनी एक दिवस शेअर बाजारात भाव कसे चढ उतार होतात असा प्रश्न वडीलांना केला. तेव्हा वडिलांनी त्याला वर्तमानपत्र वाचण्याचा सल्ला दिला. शेअर बाजाराबद्दलचा हा त्यांचा पहिला धडा होता.
कुटुंबाविषयी माहीती राकेश झुनझुनवाला यांना दोन भाऊ व दोन बहीनी आहेत. राकेश झुनझुनवाला यांचा मोठा भाऊ राजेश चार्टर्ड अकाउंटंट आहे. 22 फेब्रुवारी 1987 रोजी रेखा झुनझुनवालासोबत राकेश यांचा विवाह झाला होता. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म RARE Enterprises सुरू केली. राकेश आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या नावाने ही फर्म सुरू आहे. RA म्हणजे राकेश आणि RE म्हणजे रेखा झुनझुनवाला. रेखा झुनझुनवाला या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. दोघांना एक मुलगी आणि दोन जुळी मुले आहेत. लग्नाच्या 17 वर्षानंतर 30 जून 2004 रोजी मुलगी निष्ठा हिचा जन्म झाला. राकेश आणि रेखा यांची जुळी मुले आर्यमन आणि आर्यवीर यांचा जन्म २००९ मध्ये झाला.
पत्नीने घेतला मुलांसाठी आयव्हीएफचा आधार लग्नानंतर राकेश आणि रेखा यांना अनेक वर्षे मुले झाली नाहीत. मुलाच्या हव्यासापोटी दोघांनीही आयव्हीएफचा सहारा घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार एक-दोन नव्हे तर सहा वेळा रेखाने आयव्हीएफद्वारे मुलासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांची मुलगी नताशाचा जन्म झाला.
शेअर बाजाराला निवडले करिअर शिक्षण पूर्ण केल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजाराला आपले करिअर म्हणून निवडले. 1986 मध्ये त्यांना पहिले मोठे यश मिळाले. जेव्हा त्यांनी टाटा टी चे 5000 रुपयांचे शेअर्स 43 रुपये प्रति शेअर दराने विकत घेतले. आणि अवघ्या 3 महिन्यांनंतर ते शेअर्स 143 रुपये प्रति शेअर या दराने विकले. यानंतर त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीचा आणि शेअर बाजारातील ज्ञानाचा वापर करून अवघ्या 3 वर्षात 25 लाख रुपयांचा नफा कमावला.
राकेश झुनझुनवाला यांनी एका वृत्त वाहीनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना माजी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करणार करायचे आहे. यावरुन झुनझुनवाला यांचा मनमिळावु स्वभाव दिसुन येतो.