ETV Bharat / city

Acharya Atre जयंतीनिमित्त जाणून घेऊयात आचार्य अत्रेंचा जीवन प्रवास - life journey

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते मराठीतील नावाजलेले लेखक कवी नाटककार संपादक चित्रपट निर्माते शिक्षणतज्ज्ञ राजकारणी व वक्ते अशी बहुगुणी ओळख असलेल्या प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांची आज जयंती जाणुन घेऊया त्यांच्या जीवन प्रवासाबाबत

Acharya Atre
आचार्य अत्रेंचा जीवन प्रवास
author img

By

Published : Aug 12, 2022, 8:09 PM IST

मुंबई महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील' प्रमुख नेते Prominent leaders of the United Maharashtra movement मराठीतील नावाजलेले लेखक कवी नाटककार संपादक चित्रपट निर्माते शिक्षणतज्ज्ञ राजकारणी व वक्ते अशी बहुगुणी ओळख असलेल्या प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला झाला त्यांची आज जयंती Acharya Atre birth anniversary Special जाणुन घेऊया त्यांच्या जीवन प्रवासाबाबत life journey

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत' प्रमुख नेते अशी भुमिका साकारणाऱ्या आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला, असे मानले जाते. मात्र,अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते.

अत्रे यांचा शिक्षण प्रवास आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.

गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन, पदवी परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

अध्यापन अत्रे यांनी मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले. नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र त्यांना या शाळेतच मिळाला.

पत्रकारिता इ.स. १९२३ साली अत्रे यांनी अनेक मासिके काढलीत. त्यामध्ये 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्‍नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२ पर्यंत ते चालू होते. २ जून, इ.स. १९४७ रोजी त्यांनी 'जयहिंद हे सांजदैनिक' सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. १५ नोव्हेंबर, इ.स. १९५६ रोजी त्यांनी 'मराठा' हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.

आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या, त्यांची नावे पुढील प्रमाणे आहे.

आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली मुंबई

आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे

आचार्य अत्रे कन्या कॉलेज पुरंदर

आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड

आचार्य अत्रे पुतळा वरळी

आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड

आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे

आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर

आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी

आचार्य अत्रे सभागृह, पुणे

आचार्य अत्रे साहित्य संमेलन, सासवड

सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड

आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबई

आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणे ४११०१६

चित्रपटातील लिखाणांची कारकीर्दे इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्रे यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स' साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.

नवयुग पिक्चर्स सोडले अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने नवयुग चित्रपट कंपनी' काढली पुढे हंस पिक्चर्स मधले मास्टर विनायक पांडुरंग नाईक बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने नवयुग पिक्चर्स असे नाव बदलून घेतले १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे लपंडाव' चित्रपटाची कथा त्यांनी लिहिली. नंतर त्यांनी संत सखू या चित्रपटाचे संवाद लिहिले परंतु प्रभात ने ही हाच विषय घेतला. या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि स खांडेकरांची अमृत ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. यादरम्यान झालेल्या वादामुळे त्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ मिळाले होते

शाळांसाठी क्रमिक पुस्तके आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली, अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते पाचवी हल्लीच्या पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमांत होती सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती काढली आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी ही नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती बाजारात आणली आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक २१ जानेवारी १९४० रोजी प्रकाशित झाला

आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी आचार्य अत्रे हे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल चे आणि गिरीश हे न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. 2022 सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल. अशी त्यांची अलौकीक पुस्तके होती

गाजलेली नाटके आचार्य अत्रे हे महाकवी कालिदास आणि गानअवलिया तानसेन अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते ते संत नामदेव संत जनाबाई ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होते. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती. अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी पुंडलिक ठरवला होता शिवसमर्थ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता

पुरस्कार आणि सन्मान विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णूदास भावे पुरस्कार देत आली आहे आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात अशोक हांडे यांची संकल्पना लेखन व दिग्दर्शन असलेला अत्रे अत्रे सर्वत्रे हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे मी अत्रे बोलतोय हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संम्मेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात त्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.

पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्‌मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्‌मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.

हेही वाचा Achievements75 क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.