मुंबई - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर 1 फेब्रुवारीला संसदेला घेराव घालण्याचा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिला आहे. मुंबईत किसान मोर्चाच्या सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आझाद मैदानावर महिला शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण करून किसान महामोर्चाची सांगता झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित नवले यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 1 फेब्रुवारीच्या सुमारास लाँग मार्च काढून संसदेला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. 'जब तक कानून वापसी नहीं, तब तक आंदोलन वापसी नहीं' असे ते यावेळी म्हणाले.
राज्यपालांनी संपर्क केला नाही
निवेदन स्वीकारण्यासंदर्भात उपस्थित नसल्याविषयी राज्यपालांनी शेतकरी नेत्यांना कसलाही संपर्क केला नाही असेही अजित नवलेंनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी नेते प्रकाश रेड्डींनाही राज्यपालांचे कोणतेच पत्र मिळाले नाही. राज्यपालांनी संपर्क केला की नाही हा मुद्दा नसून त्यांचे प्राधान्य कशाला आहे हा मुद्दा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाची ध्वजारोहणानंतर झाली सांगता