ETV Bharat / city

Ex IPS A A Khan Dies At 81 : एन्काऊंटर स्पेशलिस्ट माजी आयपीएस अधिकारी ए. ए. खान यांचं निधन - मुंबई गँगवार

मुंबई पोलिस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट ( Encounter Specialist A A Khan ) म्हणून ओळख असलेल्या माजी आयपीएस अधिकारी ए. ए. खान यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे ( Ex IPS A A Khan Dies At 81 ) होते. त्यांच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ( Kokilaben Hospital Mumbai ) उपचार सुरु होते. कुख्यात गुंड माया डोळस याचा त्यांनी एन्काउंटर ( Maya Dolas Encounter ) केला होता.

ए. ए. खान
ए. ए. खान
author img

By

Published : Jan 21, 2022, 9:50 PM IST

मुंबई- मुंबईतील एकेकाळचा कुख्यात गुंड माया डोळसचा एन्काऊंटर ( Maya Dolas Encounter ) करणारे मुंबई पोलीस दलातले माजी आयपीएस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट ए. ए. खान यांचं निधन झालं ( Ex IPS A A Khan Dies At 81 ) आहे. आज वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ( Kokilaben Hospital Mumbai ) उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतला एकेकाळचा कुख्यात गुंड माया डोळचा एन्काऊंटर केल्यामुळे खान प्रकाशझोतात आले ( Encounter Specialist A A Khan ) होते.

'शूटआऊट एट लोखंडवाला'ची अनेकांना आठवण

ए. ए. खान यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात आज दुपारी 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा माया डोळस आणि 'शूटआऊट एट लोखंडवाला' ( Shootout At Lokhandwala ) या घटना प्रसंगाची अनेकांना आठवण झाली. शूटऑऊट एट लोखंडवाला नावाने काही वर्षांपू्र्वी मुंबईच्या गँगवारवर ( Gangwar In Mumbai ) आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कुख्यात गुंड माया डोळसची जीवनकथा दाखविण्यात आली होती. या सिनेमात विवेक ऑबेरॉयने माया डोळसची भूमिका केली होती. 16 नोव्हेंबर 1991 रोजी अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या एन्काऊंटरमध्ये खान आणि त्यांच्या पथकाने माया डोळस आणि त्याच्या सहकाऱ्यांचा एन्काऊंटर केला होता. ए. ए. खान हे आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जायचे. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्येही त्यांची जरब होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई पोलीस दलाने एक उमदा अधिकारी गमावल्याची भावना बोलून दाखवली जात आहे.

डोळसची संपवली दहशत

कुख्यात गुंड माया डोळसवर खंडणी, हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. मुंबईच्या रस्त्यावर त्या काळात माया डोळसची दहशत होती. खान यांनी ही दहशत संपवली होती. पोलिस अधिकारी ए. ए. खान यांनी अधिकाऱ्यांना कमांडोजना त्यांच्या जागा आखून दिल्या होत्या. आता अॅक्शनची वेळ होती. दुसऱ्या मजल्यावर डी गॅंगचा माया डोळस आणि त्याचे साथीदार लपले होते, याची माहिती होती. अनेक मर्डर, खंडणीची प्रकरणे त्याच्या नावावर होती. मोस्ट वॉन्डेट माया जवळ पोलिस पोहचले होते. या थरारयुद्धात ए. ए. खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेथेच मायाचा खात्मा करण्यात आला. चित्रपटात अभिनेता संजय दत्तने ए. ए. खानची भूमिका बजावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.