मुंबई - रस्त्यांच्या दुभाजकावर मुंबईकरांना लवकरच एलईडी लाईट्स दिसणार आहेत. एलईडी दुभाजकाने बोरिवलीच्या सौंदर्यात भर पडेल. आर मध्य वॉर्डच्या सहायक पालिका आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता, परीरक्षण राजेश अक्रे यांनी संबंधित कामगिरी पार पाडली. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना आर मध्य वॉर्डमध्ये अन्य भागात सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार बोरिवली रेल्वे स्थानक पश्चिम ते गोराई या सात ठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांवर एलईडी लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. यामुळे बोरिवलीच्या सौंदर्यात भर पडली असून, महानगरपालिकेची ही पाहिली योजना असल्याची माहिती आर मध्य वॉर्डच्या सहायक पालिका आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली. एलईडी लाईट्समुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, नागरिकांनी वाहने चालवताना एलईडी लाईट्सची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. कापसेंनी केले आहे.
हेही वाचा -राहुल, सोनिया गांधींसह ८ जणांवर चिथावणीखोर भाषण प्रकरणी गुन्हा दाखल करा