ETV Bharat / city

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा आत्मविश्वास हरवला आहे - प्रवीण दरेकर

महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांना आत्मविश्वास राहिला नसल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षचं एकमेकांना आव्हान देऊ लागली आहेत, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.

author img

By

Published : Jul 12, 2021, 5:34 PM IST

Updated : Jul 12, 2021, 5:46 PM IST

Praveen Darekar criticizes the Mahavikas Aghadi government

मुंबई - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहेत. आपण स्वबळाचा नारा दिल्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांना आत्मविश्वास राहिला नसल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षचं एकमेकांना आव्हान देऊ लागली आहेत, असा चिमटाही प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला. आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते.

प्रवीण दरेकरांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे की अस्थिर, याचे राज्यातील जनतेला काहीही घेणे देणे नाही. राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. या संकट समयी राज्य सरकारने जनतेला धीर द्यायला हवा. आत्मविश्वास द्यायला हवा. खुद्द शरद पवार यांनी सांगितलं होतं की, पक्ष वेगळा आणि सरकार वेगळे आहे. मात्र सरकार म्हणूनही तीनही पक्ष एकत्र दिसत नाहीत. अशा परिस्थितीत तिनही पक्ष एकमेकांच्या विरोधात अविश्वास दाखवत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले असं मतही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं.
आघाडी सरकारला जनतेशी देणे-घेणे नाही - भातखळकर
राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. राज्यातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून अजून बाहेर आली नाही, अशी गंभीर परिस्थिती राज्यात असताना महाविकास आघाडी सरकारला केवळ विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार? आणि आपला पक्ष कसा वाढणार, याचीच चिंता महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षाला असल्याचा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लगावलाय.

Last Updated : Jul 12, 2021, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.