मुंबई - माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ग्रामपंचायती निवडणूकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सरकारमध्ये तीन पक्षीय घटकांचा समावेश आहे. खासकरून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, सर्व ठिकाणी भाजप सर्वात मोठी पार्टी आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे आहोत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सगळ्या जागा जिंकलो आहोत.
देवेंद्र फडणवीस यांनी असेही सांगितले की, लॉकडाउन काळात मोदीचे काम लोकांनी पाहिले आहे. तर दुसरीकडे गरीब मजूरांची मदत न करणारे राज्य सरकारही लोकांनी अनुभवले आहे.
सिंधुदुर्गात 80 टक्के जागांवर भाजपने यश मिळवले -
फडणवीस म्हणाले कोंकण सिंधुदुर्ग येथे 80 टक्के जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. रत्नागिरीमध्ये मोठा विजय मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातही पक्षाने चांगले प्रदर्शन केले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते पक्षासाठी समर्पित होऊन कामे करीत आहेत. ही विविधता आहे, एकूण एकत्रित परिणामांचे यश असल्याचे ते म्हणाले.
हे स्पष्ट आहे की, राज्य सरकारबद्दल जनतेच्या मनामध्ये राग आहे. या निवणुकीत तीन पक्ष भागीदारी करून सुद्धा त्यांना भाजपला रोखता आलेले नाही.