ETV Bharat / city

Lata Mangeshkar Birth Anniversary : लता मंगेशकर यांची आज जयंती; पंतप्रधान मोदींनी केले स्मरण - लता मंगेशकर पहिली जयंती

आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती (Lata Mangeshkar Birth Anniversary) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण (PM Modi Remember Lata Mangeshkar) केले. गानप्रतिभेचे सर्वोच्च वरदान लाभलेल्या लता मंगेशकरांना गानकोकिळा असे म्हटले जाते.

Lata Mangeshkar
गानसम्राज्ञी लता मंगेशकर
author img

By

Published : Sep 28, 2022, 8:45 AM IST

मुंबई - आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती (Lata Mangeshkar Birth Anniversary) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण (PM Modi Remember Lata Mangeshkar) केले. गानप्रतिभेचे सर्वोच्च वरदान लाभलेल्या लता मंगेशकरांना गानकोकिळा असे म्हटले जाते. अष्टपैलू गायकांमध्ये नावाजल्या गेलेल्या लतादीदी चमचमत्या सिताऱ्यांपैकी एक होत्या. आपल्या आवाजाने त्यांनी श्रोतृवृंदाला कायमच आपलेसे केले, त्यामुळे जगभरातून त्यांचा चाहतावर्ग निर्माण झाला.

  • Remembering Lata Didi on her birth anniversary. There is so much that I recall…the innumerable interactions in which she would shower so much affection. I am glad that today, a Chowk in Ayodhya will be named after her. It is a fitting tribute to one of the greatest Indian icons.

    — Narendra Modi (@narendramodi) September 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लतादीदी यांचा जीवनप्रवास - लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदौर येथे झाला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. दीनानाथ मंगेशकर त्यांचे वडील तर आईचे नाव शुद्धमती असे होते. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ अशी त्यांची भावंडे जे आज घडीला नावाजलेले संगीतकार आणि गायक आहेत. त्याकाळी वडील पं. दीनानाथ यांनी लतादीदींना अगदी लहान असतानाच संगीताचे धडे देण्यास सुरू केले. मात्र, दरम्यानच्या काळात वडील गेले आणि सारी जबाबदारी त्यांच्यावर पडली. लतादीदी त्यावेळी गाण्याचे कार्यक्रम करीत असत. आपल्या गानप्रतिभेच्या जोरावर त्या पुढे आल्या आणि संगीताच्या एका युगावर आपले नाव कोरले.

आठ दशकांचे करीअर लाभलेल्या लतादीदींनी आतापर्यंत अनेक बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाच नव्हे तर तिची मुलगी आणि तिची नात अशा तीन पिढ्यांसाठी लतादीदींनी आपला आवाज दिला. याचे उदाहरण म्हणजे काजोल, लतादीदींनी तीची आजी शोभना समर्थ, आई तनुजा यांच्या व्यक्तिरेखा आपल्या आवाजातून पुढे आणल्या. याच गानप्रतिभेतून कित्येक पात्रांना गायनाच्या प्रतिभेतून त्यांनी अजरामर केले. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली असून त्यापैकी हजारो गाणी हिंदी सिनेमा आणि इतर 36 प्रादेशिक चित्रपटांसाठी गायली आहेत.

लतादीदींना मिळालेले पुरस्कार - 1974 रॉबर्ट अल्बर्ट हॉलमध्ये परफॉर्म करणारी पहिली भारतीय, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मानकरी, 15 बंगाल चित्रपट पत्रकार संघ पुरस्कार, 4 फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला प्लेबॅक पुरस्काराने गौरव, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, 2001 मध्ये, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न प्रदान करण्यात आला, तर फ्रान्स सरकारने 2007 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार (ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर) प्रदान केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.