मुंबई: समीर वानखेडेंना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग सुरु आहे. असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. ते म्हणाले, ''मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे कार्यकाळ वाढवून मागत नाही. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहे. अशा बातम्या पेरल्या जात आहेत.'' कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही? असा सवाल मंत्री नवाब मलिक (NCP spokesperson Nawab Malik) यांनी उपस्थित केला आहे. तसेच एनसीबी खोट्या पद्धतीने पंचनामे करून लोकांना अडकवत आहे असा आरोपही त्यांनी लावलेला आहे. बॅक डेटेड पंचनामे करण्यासाठी अधिकारी पंचानवर दबाव टाकत आहेत असाही आरोप त्यांनी लावलेला आहे. त्याच सोबत करण सजलानांनी आणि इतर आरोपींच्या विरोधात एनसीबी हायकोर्टात का गेली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
एसआयटी ने आतापर्यंत काय केले?
मलिक यांचे जावई समीर खान यांच्या जामिनाला एनसीबीनं हायकोर्टात आव्हान दिलंय. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर 27 सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. परवा एनसीबीनं हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केलंय. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केली.
मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मागील काही काळापासून हजारो करोडो रुपयांची वसुली सुरू आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती त्याचं पुढे काय झाले. आमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पुरावे कोर्टात सादर केले. त्यावेळी न्यायालयाला मी हे देखील विचारलं होत की मला एनसीबी जर काही चुकीचं काही करत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का तर त्याला हो असं उत्तर मिळालं होतं. '
काल नवीन वर्षात केले होते ट्विट
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी नव्या वर्षात नवा संकल्प केला आहे. नव्या वर्षातही 'फर्जीवाडा'विरोधात माझा लढा सुरूच राहील, (forgery of NCB will be brought this year too) असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नव्या वर्षातील हा नवा संकल्प आहे. मी माझा लढा सुरूच ठेवणार असून, एक दिवस सत्य नक्कीच समोर येईल, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. खोट्या प्रकरणांत अडकवून हप्ते वसुली केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. इतकेच नाही तर, समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांद्वारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
हेही वाचा : Ajit Pawar On Narayan Rane : अजित पवारांचा नारायण राणेंना टोला; म्हणाले, "उणीधुणी काढत बसण्यापेक्षा..."