ETV Bharat / city

Lakhimpur Khiri Case : लखीमपूर-खीरी घटनेत मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या अस्थी मुंबईच्या समुद्रात विसर्जित - शेतकर्‍यांच्या अस्थी मुंबईच्या समुद्रात विसर्जित

शेतकऱ्यांच्या अस्थी ( Ashes of the Martyred Farmers ) आज (रविवारी) मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात विसर्जित ( Immersed in the Arabian Sea ) करण्यात आल्या. संयुक्त मोर्चा समितीचे राष्ट्रीय नेते राकेश टीकेत,( Farmer Leader Rakesh Tikait ) योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत या अस्थी समुद्रात विसर्जित करण्यात आल्या.

अस्थी विसर्जित करतांना राजेश टीकैत
अस्थी विसर्जित करतांना राजेश टीकैत
author img

By

Published : Nov 28, 2021, 8:16 PM IST

Updated : Nov 28, 2021, 8:25 PM IST

मुंबई - ३ ऑक्टोंबर रोजी लखीमपूर-खीरी ( Lakhimpur Khiri Case ) घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी ( Ashes of the Martyred Farmers ) आज (रविवारी) मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात विसर्जित ( Immersed in the Arabian Sea ) करण्यात आल्या. संयुक्त मोर्चा समितीचे राष्ट्रीय नेते राकेश टीकैत,(
Farmers Leader Rakesh Tikait ) योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत या अस्थी समुद्रात विसर्जित करण्यात आल्या.

लखीमपूर खीरीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थीचे विसर्जन करतांना राजेश टीकैत

देशभर श्रद्धांजली अर्पण करून मुंबईत अस्थी विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर मागील वर्षभरापासून दिल्लीच्या तख्तावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु मागील वर्षभरात हे आंदोलन करताना ७०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी देशभर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी फिरवण्यात आल्या. या दुर्दैवी घटनेबाबत संताप व्यक्त करत २१ ऑक्टोंबरपासून या अस्थी संपूर्ण देशभर विविध ठिकाणी नेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबईमध्ये सुद्धा विविध ठिकाणी अस्थी कलश नेण्यात आल्यानंतर त्यांना गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्रात विसर्जन करण्यात आले. आज संयुक्त किसान मोर्चा तर्फे विराट महापंचायत आयोजन मुंबईतील आझाद मैदानातमध्ये करण्यात आले होते. या दरम्यान सुद्धा हे अस्थी कलश मंचावर ठेवण्यात आले होते. महापंचायत सभेनंतर संयुक्त किसान मोर्चाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात श्रद्धांजली अर्पण करून या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.

हेही वाचा - लखीमपूर हिंसाचार घटनेचे रिक्रिएशन, पोलिसांनी मंत्रीपुत्रासह तिघांना नेले घटनास्थळी

Last Updated : Nov 28, 2021, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.