मुंबई - अमरावतीचे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Mla Ravi Rana ) या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नवनीत राणांनी 'बाळासाहेब आमच्या वडिलांसारखे असून, श्रद्धास्थान आहेत. त्यांचे निवासस्थान आमच्यासाठी पवित्र आहे. म्हणून आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच,' अशी भूमिका घेतली. त्याला आता शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'यांनी तर आमच्या पक्षाचा बाप पण हायजॅक केला,' असा खोचक टोला पेडणेकर यांनी राणा दाम्पत्याला लगावला ( Kishori Pednekar Taunt Rana )आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'यांनी तर आमच्या पक्षाचा बापच हायजॅक केला. यांना स्वतःचा बाप नाही का? हे एका बापाचे आहेत की नाहीत? यांना स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा बाप हायजॅक करावा लागतोय ही यांची लायकी. दुसऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या बाहुल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर या मातोश्रीवर. मातोश्री ही आमच्या बापाची आहे तुमच्या बापाची नाही. त्यामुळे बाप पण हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका," असा थेट इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.
आमच्या वाकड्यात जाऊ नका - 'हे शिवसैनिक आहेत. ही स्वतःहून बाळासाहेब आणि शिवसेनेवरच्या प्रेमासाठी आलेले कार्यकर्ते आहेत. आम्हाला भाड्याने माणसं आणावी लागत नाहीत. आमच्या वाकड्यात जाऊ नका. लक्षात ठेवा ही शिवसेना आहे,' असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा - बाळासाहेबांचे निधन झाले, त्यावेळी त्यांच्यासोबत साहेबांची विचारधारा देखील निघून गेली. सत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही विचारधारा सोडली नाही. बाळासाहेब असते तर आता आम्हाला शंभर वेळा येण्यास परवानगी दिली असती. ते हिंदुत्वाचे बाप आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत. आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणारच, असा निर्धार नवनीत राणा यांनी केला आहे.
हेही वाचा - Shivsena Vs Rana : राणा दाम्पत्याचे आव्हान, मुख्यमंत्री ठाकरे 'मातोश्री'वर दाखल