मुंबई याकूब मेमन कबर सजावट (yakub memon grave controversy) प्रकरणावरून भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) आरोप केले होते. दरम्यान, किशोरी पेडणेकरांचा (kishori pedanekar) याकूब मेमनचा नातेवाईक रौफ मेमन सोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, किशोरी पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचाचं रौफ मेमन सोबतचा फोटो समोर (Fadnavis photo with Rauf Memon) आणला आहे. भाजपने उत्तर द्याव, अशी मागणीदेखील पेडणेकरांनी केली आहे. यावरून पेडणेकर यांनी एक ट्विट (pedanekar twitt on rauf memon) केले आहे. यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील रौफ मेमन सोबत दिसत आहेत. तसेच भाजपाच्या १२ तोंडाने बोलणाऱ्या लोकांनी या फोटोला कॅप्शन देण्याचे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.
फडणवीसांसोबत रौफ मेमन (Rauf Memon with Fadnavis) दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीवरून बडा कब्रस्तानला धमकी देण्यात आली होती. हा धमकी देणारा रौफ मेमन याचा फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबत व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
काय आहे प्रकरण
मरीन लाइन्स येथे बडा कब्रस्तान आहे. त्यात १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर दफन करण्यात आले होते. या कबरीचे महविकास आघाडी सरकार असताना सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपाने थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले होते. यानंतर पोलिसांनी कबरी जवळची लाईट काढून टाकली आहे.
-
भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे pic.twitter.com/OO2ldr2iYd
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे pic.twitter.com/OO2ldr2iYd
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे pic.twitter.com/OO2ldr2iYd
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 10, 2022