ETV Bharat / city

Kirit Somaiya visit BMC : किरीट सोमैया मुंबई पालिकेत; भ्रष्टाचार प्रकरणांची घेतली माहिती

author img

By

Published : Feb 9, 2022, 6:43 PM IST

Updated : Feb 9, 2022, 7:20 PM IST

भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya visit BMC) यांनी आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला (BMC) भेट दिली. पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील माहिती गोळा करण्यासाठी सोमैया यांनी ही भेट दिल्याचे समोर आले आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Kirit Somaiya visit BMC
किरीट सोमैया मुंबई पालिकेत

मुंबई - राज्यांमधील विविध पक्षामधील राजकीय नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया (Kirit Somaiya visit BMC) यांनी आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट (Visit BMC) दिली. पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील (BMC corruption) माहिती गोळा करण्यासाठी सोमैया यांनी ही भेट दिल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोमैया यांच्याकडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची प्रकरणे बाहेर काढली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विनोद मिश्रा - भाजपा पक्षनेते, मुंबई महापालिका
  • शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव -

मुंबईमध्ये गेले दोन वर्षात कोरोनाचा प्रसार आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून नागरिकांच्या सहकार्यामुळे त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षात मुंबईमध्ये १० लाख ५२ हजार १७६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून १६ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पालिकेकडून जंबो कोविड सेंटर, औषधे पुरवठा, मनुष्यबळ पुरवठा, विविध यंत्रसामुग्री, मास्क, पिपीई किट पुरवणे आदींची कंत्राटे देण्यात आली आहेत. या सर्वांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप भाजपकडून सतत केला जात आहे. ही कंत्राटे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या लोकांनाच देण्यात आल्याचाही आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. हा भ्रष्टाचार बाहेर काढून येत्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव भाजपचा आहे.

Kirit Somaiya visit BMC
मुंबई पालिका परिसरात पोलीस बंदोबस्त
  • सोमैया पालिका मुख्यालयात -

मुंबई महापालिकेने कोरोना दरम्यान जी कंत्राटे दिली आहेत त्याची माहिती मिळवण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आरटीआय टाकले आहेत. या आरटीआयला पालिकेकडून कोणतीही उत्तरे दिली नाहीत. यामुळे सोमैया यांनी अपील दाखल केले आहे. याची सुनावणी आज महापालिका मुख्यालयात होती. त्यासाठी सोमैया महापालिका मुख्यालयात आले होते. या दरम्यान त्यांनी आरटीआयची माहिती मिळवण्यासाठी सुनावणीत भागही घेतला. मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. सोमैया यांनी पालिकेतील कोविड काळात दिलेल्या कंत्राटांची माहिती मागवली आहे. याची आज सुनावणी होती. त्यासाठी सोमैया पालिका मुख्यालयात आल्याची माहिती भाजपचे पालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी दिली.

  • पालिका मुख्यालय बनले पोलीस छावणी -

किरीट सोमैया यांच्याकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील नेत्यांची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. नुकतेच ते पुण्याला गेले असता त्यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमैया आज मुंबई महापालिका मुख्यालयात आल्याने पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

Last Updated : Feb 9, 2022, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.