ETV Bharat / city

'इंदिरा गांधींबद्दल आव्हाड हे बरोबर बोलले, त्यांचे नेते समर्थन करतील' - किरीट सोमय्या ऑन मंत्री आव्हाड

इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असे वादग्रस्त विधान महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. बीडमधील संविधान महासभेत ते बोलत होते.

Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमय्या
author img

By

Published : Jan 30, 2020, 3:43 AM IST

मुंबई - इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असे वादग्रस्त विधान महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. बीडमधील संविधान महासभेत ते बोलत होते. देशात आज ठिकठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर, आव्हाड हे बरोबर बोलले आहेत, अशी आगीत तेल टाकणारी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या

हेही वाचा - नागरिकत्व कायदा लागू करणार नसल्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

याअगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी दर्शवली. यानंतर राऊतांनी केलेले वक्तव्य मागे घेतलं व माफी मागितली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधलेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही आज वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारमध्ये वादविवाद होणार असे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री आव्हाड हे बुधवारी बीडमध्ये आयोजित संविधान सभेत बोलत होते. यावेळी ते भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारवर चांगलेच बरसले. पण, टीका करताना त्यांनी मोदींना सल्ला देताना चक्क इंदिरा गांधी यांचा संदर्भ देत इंदिरा गांधी यांना लोकशाहीविरोधक ठरवले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की ‘ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जे बोलले ते अगदी खरं आहे. या त्यांच्या वक्तव्यावर कुणीही सहमत असेल, असे म्हटले आहे.

Intro:इंदिरा गांधीबद्दल आव्हाड हे बरोबर बोलले,त्यांचे नेते समर्थन करतील-किरीट सोमय्या

इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता असे वादग्रस्त विधान महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. बीडमधील संविधान महासभेत ते बोलत होते. देशात आज ठिकठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. हे सर्व अचानक का होत आहे ? असा सवालही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर आव्हाड हे बरोबर बोलले आहे अशी आगीत तेल टाकणारी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

याअगोदर शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं .यावर काँग्रेस नेत्यांनी नाराजी दर्शवली यानंतर राऊतांनी केलेले वक्तव्य मागे घेतलं व माफी मागितली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार मधलेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे आज वादग्रस्त विधान केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारमध्ये वादविवाद होणार असे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री आव्हाड हे आज बीड मध्ये आयोजित संविधान सभेत बोलत होते.यावेळी ते भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारवर चांगलेच बरसले.पण मात्र टीका करतांना त्यांनी मोदींना सल्ला देतांना चक्क इंदिरा गांधी यांचा संदर्भ देत इंदिरा गांधी यांना लोकशाही विरोधक ठरवले.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की ‘ गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जे बोलले ते अगदी खरं आहे.या त्यांच्या वक्तव्यावर कुणीही सहमत असेल असे म्हटले आहे.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.